शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:22 IST

पुरवठा विभागाचे सर्व कामकाज बंद असून मागण्यांसंदर्भात राज्य महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे या काम बंद आंदोलनात निवडणुकीचे काम वगळण्यात आले असून फक्त महसूली कामे बंद आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक कामांना वगळले : मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुरवठा विभागाचे सर्व कामकाज बंद असून मागण्यांसंदर्भात राज्य महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे या काम बंद आंदोलनात निवडणुकीचे काम वगळण्यात आले असून फक्त महसूली कामे बंद आहेत.या आशयासंदर्भात जिल्हाधिकाºयांना जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील सरळ सेवेच्या वाट्यातील पदे जी महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गातून बदलीने भरण्यात येतात ती पदे टप्प्याटप्प्याने जाहिरातीच्या अनुषंगाने निर्देशित करण्याचे विभागीय आयुक्तांनी कळविले आहे. संदर्भात सरळ सेवेच्या उमेदवारांची भरती झाल्यानंतर महसूल विभागाची पदे प्रस्थापित करण्यात यावीत असेही निर्देश आहेत. त्यामुळे महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करणे, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४ हजार ३०० वरुन ४ हजार ८०० करण्यात यावा, अव्वल कारकून वर्ग तीन या संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर करण्यात यावी, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, नायब तहसीलदारांचे सरळ सेवा भरतीचे पद प्रमाण ३३ वरून २० टक्के करून पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के करावे, दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात आकृतीबंधात सुधारणा करण्यासाठी लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व इतर पदांमध्ये कपात करू नये, संजय गांधी योजना, गौण खनीज व महसूल व इतर कामासाठी नव्याने आकृतीबंध तयार करणे, पुरवठा विभागातील निरीक्षक पद पदोन्नतीचे असल्यामुळे सरळ सेवेने भरण्यात येऊ नये मागण्यांचा समावेश आहे. कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभा घेऊन मागण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी संघटनेचे किशोर राऊत, एस.एस. साखरवाडे, संजय जांभुळकर अन्य कर्मचारी उपस्थित होते.