शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे

By admin | Updated: September 9, 2015 00:33 IST

पक्षाने काय दिले हा विचार न करता सर्व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे. पक्षामध्ये भेदभाव ठेवू नये. जाती धर्माचे बंधने तोडून एक दिलाने पक्षासाठी काम करावे, ...

कार्यकर्ता मेळावा : चित्रा वाघ यांचे प्रतिपादनभंडारा : पक्षाने काय दिले हा विचार न करता सर्व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे. पक्षामध्ये भेदभाव ठेवू नये. जाती धर्माचे बंधने तोडून एक दिलाने पक्षासाठी काम करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. भंडारा येथे राष्ट्रवादी काँगे्रस तथा महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, महिला जिल्हाध्यक्ष नलिनी कोरडे, कृषी सभापती नरेश डहारे, महिला व बाल विकास सभापती शुभांगी रहांगडाले, युवती अध्यक्ष कल्याणी भुरे, सच्चिदानंद फुलेकर यांनी उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना वाघ यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून चालण्याची क्षमता दाखवून दिली आहे. जिल्ह्याला प्रफुल पटेलांसारखे कुशल नेतृत्व मिळाले असून त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सभेला उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. सभेला नगरपरिषद उपाध्यक्षा कविता भोंगाडे, जिल्हा परिषद सदस्य पार्वता डोंगरे, मनोरथा जांभुळे, ज्योती खवास, संगीता सोनवाने, गीता माटे, माधुरी देशकर, अर्मिला आगासे, नगरसेविका विद्या फुलेकर, रत्नमाला साठवणे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होत्या. संचालन ज्योती टेंभुर्णे तर प्रास्ताविक कल्याणी भुरे यांनी केले.कार्यक्रमासाठी उत्तम कळपाते, नंदू झंझाड, स्वप्नील नशिने, राजू हेडावू, पंकज ठवकर, अक्षय पवार, नितीन तुमाने, सुभाष वाघमारे, हितेश सेलोकर आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)