शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:59 IST

राज्यात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसन्मानजनक वागणुकीची मागणी : शासनाच्या निषेधार्थ घेतला पुढाकार, प्रशासनाला निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्यात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे.त्याच्या निषेधार्थ वस्तू व सेवाकर खात्यातील अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना व गट ड कर्मचारी संघटनाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वदूर महाराष्ट्रातील ४ ते ८ डिसेंबर असे पाच दिवस काळ्या फिती लावून काम करण्याचे ठरविले आहे, असे अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे व महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटना मुंबई नागपूर विभागाचे सदस्य राजेश राऊत यांनी माहिती दिली.वस्तु व सेवा कर विभागाच्या प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाच्या निर्देशानुसार योग्यरितीने कामेसुद्धा पुर्ण केली. परंतु या सर्व कार्यवाहीमध्ये गट ड कर्मचाºयांपासून ते वरिष्ठ अधिकारी पदापर्यंतच्या सर्वांना सेवाशर्ती आणि प्रश्नांकडे शासन प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शासन उद्दीष्टपुर्ती करण्याकरिता आवश्यक गट ड संवर्गासह सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा, राज्यकर विभागातील खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे, वस्तू व सेवा कर विभागात केंद्राच्या धरतीवर समान काम, समान पद व समान वेतन ही त्रिसुत्री लागू करा, विभागातील वेतनत्रुटीचे प्रश्न सत्वर मार्गी लावा. राज्यकर सहआयुक्त व राज्यकर उपआयुक्त वर्गातील कुंठीतता दूर करा, अधिकाऱ्यांच्या कामाचे वाटप समान व योग्य प्रमाणात करण्यात यावे, विभागाच्या पुर्नरचनेत व सेवा नियमातील बदलात संघटनांना विश्वासात घेणे, अधिकारी कर्मचारी सेवाशर्ती टिकविण्याकरिता योग्य धोरणांचा अवलंब करा, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तू व सेवाकर भवन उभारून भवनामध्ये अद्यावत आसन व्यवस्थेसह, संगणकासह सर्व साधन सामुग्री पुरवावी, विभागीय संवर्ग वाटप अधिनियमामधून राज्यकर विभागास कायमस्वरूपी सूट द्यावी, अधिकारी व कर्मचाºयांवरील ताणतणाव कमी करावा व सन्मानजनक वागणूक मिळावी आदी या विषयक सर्वच बाबींवर शासन प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे, अशी माहिती अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे यांनी दिली.