शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचनाची कामे पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:59 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपसासिंचन योजनांची कामे लवकरात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

ठळक मुद्देजलसंपदा राज्यमंत्र्यांचे आश्वासन : भंडारा जिल्ह्यातील अपूर्ण कामांविषयी बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपसासिंचन योजनांची कामे लवकरात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकाराने बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.योजनेतील कामे अपूर्ण असून, निधी उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे, या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी सिंचनाअभावी नापिकीचा सामना करावा लागतो. त्यातून शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. अनेक गावांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसित नवीन गावठाणांमध्ये नागरी सुविधांची कामे अपूर्ण आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणीही भोंडेकर यांनी या बैठकीत लावून धरली.जलसंपदा राज्यमंत्र्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या योजनेतील कामांचा आढावा घेतला. प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना मंजूरी प्रदान केली जाईल तसेच सुरू असलेल्या योजनांच्या कामांना गती दिली जाईल, असे आश्वासन देत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नम े योजनांचा समावेश राष्ट्रीय प्रकल्पात करण्यात यावा, यादृष्टीने अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, गोसे उपसासिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, गोसे पुनर्वसन विभगाच्या कार्यकारी अभियंता विजयाश्री बुराडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, अनिल गायधने, राजू ब्राम्हणकर, यशवंत सोनकुसरे, प्रशांत भुते, मुन्ना तिघरे, विजय कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.४५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २० टक्के कामेगोसे सिंचन प्रकल्पांतर्गत गोसे पुनर्वसन, गोसे धरण, डावा आणि उजवा कालवा या विभागाबरोबरच करचखेडा आणि नेरला उपसा सिंचन योजनेतील त्याचप्रमाणे हत्तीडोई, धारगाव, आकोट व सुरेवाडा या प्रस्तावित उपसासिंचन योजनांच्या कामांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. या योजनांद्वारे सिंचन करावयाच्या अंदाजे ४५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २० टक्के कामे झाली असून, उर्वरीत कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.