शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 00:41 IST

तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही.

वाहतुकीची कोंडी : दिवसभर उडतो धुराळा, श्वसनाचा त्रासतुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही. राज्य शसनाचा संबंधित विभाग मागील दीड वर्षापासून कामे करीत आहे. कामाची अशीच गती राहिली तर किमान चार वर्षे या उड्डाणपुल पूर्णत्वाला लागतील. सध्या येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.तुमसर रोड येथे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाला मंजूरी प्राप्त झाली. रेल्वे तथा राज्य सरकार संयुक्तरित्या उडाणपूलाला निधी उपलब्ध करुन उडाणपूल पुर्णत्वाचा करार झाला. या रेल्वे फाटकावर प्रचंड वाहतूकीची कोंडी होत असल्याने केंद्र तथा राज्य शासनाने येथे उडाणपूल मंजूर केला होता.सन २०१४ मध्ये उडाणपूलाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उडाणपुलांचे भूमिपूजन केले होते. उडाणपूलाची एकूण किंमत ४३ कोटी इतकी आहे. यात २६ कोटी राज्य शासन खर्च करणार असून १४ कोटी रेल्वे विभाग खर्च करणार आहे. राज्य शासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. दीड वर्षापासून येथे कामे सुरु आहेत. आतापर्यंत अंडरपास (भूयारी रस्ता) तयार झाला आहे. बायपास रस्ता एका बाजूचा झाला असून दुसऱ्या बाजूचा रस्ता येथे तयार केला जात आहे.दगड रोवणीचे (पिलर फिक्सींग) कामे तुमसर-रामटेक रस्त्यावर सुरु आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या उड्डाणपुलाला प्राप्त झाले आहे. अप्रीय रस्ता (तुमसर-रामटेक मार्ग) एका महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. गोंदिया मार्गावरील देव्हाडी शिवारातील 'अ‍ॅप्रोच' रस्त्याचे कामे सुरु झाली आहेत. रेल्वे ट्रॅकवरील सिमेंट पिल्लर उभारणी व त्यावरील स्पॅनची निविदा अजूनपर्यंत रेल्वेने काढली नाही, अशी माहिती आहे. बायपास रस्ता मुरुम, गिट्टी टाकून तयार करण्यात आला. वाहतूकीमुळे प्रचंड धुराळा येथे दिवसभर उडत असतो. आजूबाजूची घरे लालसर झाली आहेत. हवेतील कणांमुळे प्रदूषणाची समस्या येथे वाढली आहे. किमान रस्त्यावर सतत पाणी घालणे गरजेचे आहे.तुमसर-रामटेककडे जाणाऱ्या वळणावर खोल खड्डा पडला आहे. येथे लहान चारचाकी वाहने अडून पडतात. रात्री अंधारात हा खड्डा दिसत नाही. येथे अपघाताची नेहमीच शक्यता राहते आहे. अपघात येथे घडले आहेत. अप्रिय रस्त्यावर वीज कारखान्यातील 'पोन्टी' राख घालण्यात येत आहे. हवेमुळे ही राख उडून येथून प्रवास करणाऱ्यांच्या नाका-तोंडात जाते. गावातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने येथे दखल घेणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनानेही येथे दखल घेण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींनी येथे निधी उपलब्धतेकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)