शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडी उड्डाणपुलाचे काम संथगतीने

By admin | Updated: May 15, 2017 00:35 IST

मागील अडीच वर्र्षापासून देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. एप्रिल महिन्यात रेल्वे बांधकामाच्या निविदा काढणार होते, ...

रेल्वेकडून अद्याप निविदा नाही : बायपास रस्ता धोकादायक, निधीची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील अडीच वर्र्षापासून देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. एप्रिल महिन्यात रेल्वे बांधकामाच्या निविदा काढणार होते, परंतु अद्याप त्यांना मुहुर्त सापडला नाही. अपघाताला आमंत्रण देणारा हा उड्डाणपुल ठरत आहे. शासनाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे. उड्डाणपुलावर प्रभूकृपा होईल काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.दक्षिण - पूर्व रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला आहे. रेल्वे तथा राज्य सरकार येथे संयुक्तरित्या उड्डाणपुल तयार करीत आहे. रेल्वे ट्रॅकवरील ७० मिटरचे बांधकाम रेल्वे प्रशासन करणार असून आतापर्यंत कामाच्या निविदा रेल्वेने काढल्या नाहीत. रेल्वे प्रशासन एप्रिल महिन्यात निविदा काढणार होती. निविदा न काढल्याने उड्डाणपुलाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसर - रामटेक - गोंदिया राज्य मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता येथे उड्डाणपुलाला मंजूरी प्रदान करण्यात आली होती. सध्या राज्य शासनाचे बांधकाम खाते एप्रोच (पोहच) रस्ता तयार करीत आहे. तुमसर मार्गावरील भरावचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर गोंदिया मार्गावर भरावची कामे सुरु आहेत. परंतु कामाचा वेग अतिशय मंद आहे. मागील अडीच वर्षापासून ही कामे सुरु आहेत. निधीअभावी येथे कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. रेल्वेची निविदा केव्हा निघणार याविषयी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सांगायला तयार नाही. रेल्वेच्या निविदेकरिता ‘प्रभू’ कृपेची प्रतीक्षा करावी लागत आहे. नागपूर येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आले होते. तेव्हा उड्डाणपुलाबाबत आशा होती. परंतु याबाबत समस्या कुणीच मांडली नसल्याची माहिती आहे. रेल्वेचा अद्याप ठावठिकाणा नसल्याने राज्य शासनाचे कामे कासवगतीने सुरु आहेत. वर्दळीचा राज्य मार्ग असल्याने येथे दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होते. एप्रोच रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्ता निमूळता आहे. निमूळत्या रस्त्यावर वळणमार्ग आहे. बायपास रस्त्यावर खड्डे पडणे सुरु झाले आहे. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रात्री येथे पथदिव्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी केंद्र तथा राज्य शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्याची गरज आहे. तिरोडा येथील अदानी वीज कारखान्यातील अ‍ॅश एप्रोच रस्त्यावर भराव म्हणून घालण्यात येत आहे. वादळी वाऱ्यात ही अ‍ॅश येथे वाऱ्यासोबत हवेत पसरत असून डोळे व श्वसनाचे आजार येथे बळावित आहेत. उड्डाणपुल कामाची गती येथे वाढविण्याची गरज आहे. अशीच कामाची गती राहिल्यास किमान चार वर्ष लागण्याची शक्यता आहे. देव्हाडी - गोंदिया रस्त्यावर काही ठिकाणी विजेच्या खांबामुळे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येते. बायपास रस्त्यावर बारीक गिट्टीची चुरी टाकण्यात आली. यावरून दुचाकी घसरल्याच्या घटना दररोज घडत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.