शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात सुरू होणार ‘भेल’चे काम

By admin | Updated: May 30, 2015 00:55 IST

तत्कालीन संपुआ सरकारने कॅबिनेटची मंजुरी न घेता केवळ भूमिपूजन करुन ठेवलेल्या ‘भेल’ प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.

कृपाल तुमाने यांची माहिती : २,७०० कोटींच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी भंडारा : तत्कालीन संपुआ सरकारने कॅबिनेटची मंजुरी न घेता केवळ भूमिपूजन करुन ठेवलेल्या ‘भेल’ प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या १५ दिवसात प्रारंभ होणार असून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे प्रकल्पस्थळी येणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी शुक्रवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, केंद्रातील काही मंत्र्यांनी प्रकल्पाला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या प्रकल्पाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. त्यासाठी अन्य देशातून कोळसा आयात करावा लागत आहे. सद्यस्थितीत सौर ऊर्जेला भरपूर वाव असल्यामुळे केंद्र सरकारने सौर ऊर्जेवर उपकरणे तयार करण्यावर भर दिला आहे. आता ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत येणारा हा देशातील कारखाना ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी २,७०० कोटी रुपये मंजूर करुन या प्रकल्पातील अडचणी दूर केल्या आहेत. एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून यात केंद्राचा ७५ टक्के तर राज्याचा २५ टक्के सहभाग राहणार आहे. या प्रकल्पात सौर ऊर्जेचे टर्बाईन, सोलर प्लेट ही उपकरणे तयार करण्यात येतील. हे काम २०१५ च्या पर्यंत पूर्ण करुन २०१६ च्या प्रारंभी उत्पादन सुरू होईल. या प्रकल्पात दोन हजार लोकांना प्रत्यक्ष तर पाच हजार लोकांना अप्रत्यक्ष असे सात हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, राजेंद्र पटले, अजय तुमसरे, सुनिल कुरंजेकर, हेमंत बांडेबुचे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)‘लोकमत’चे दिले उदाहरणसौर ऊर्जा ही विजेसाठी सर्वश्रेष्ठ पर्याय असल्याचे ‘लोकमत’ने सिद्ध करुन दाखविले आहे. लोकमतचे उदाहरण देत खा.तुमाने म्हणाले, वृत्तपत्र क्षेत्रात अव्वलस्थानी असलेला ‘लोकमत’ समूह सौर ऊर्जेवर वृत्तपत्र प्रकाशित करीत आहे. २० अश्वशक्तीहून अधिक क्षमतेच्या मशीन्स सौर ऊर्जेवर सुरु राहतात. त्यामुळे सौर ऊर्जेला भविष्यात मोठी मागणी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेना स्वतंत्र लढणार यावेळी खा.तुमाने म्हणाले, शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक समिती गठीत केली असून अधिकाधिक जागा जिंकून भंडारा जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे लक्ष्य आहे.