शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:43 IST

कृषिउत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे, या मुख्य मागणीला घेवून राज्यभरातील बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले आहेत.

ठळक मुद्देसंपाचा फटका : ४२ कर्मचारी संपात सहभागी, मुंबई येथील आंदोलनात अनेकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषिउत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे, या मुख्य मागणीला घेवून राज्यभरातील बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील ४२ कर्मचारी सहभागी झाले आहेत.राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ६८७७ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत इतर राज्याप्रमाणेच सामावून घ्यावे या मागणीला घेऊन बाजार समितीचा कर्मचारी संघटनेने लढा पुकारला आहे. मागण्यांची पुर्तता करण्यासाठी शासनाने अभ्यास समितीही गठीत केली आहे. यासंदर्भात २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाला अहवाल सादर करण्यात आला. १० जानेवारी २०१८ रोजी पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचाºयांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. मात्र त्यानंतर माशी कुठे शिंकली कुणाच ठाऊक. कर्मचाºयांचा हिताचा निर्णय अडगळीत पडला. ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती, मार्केट यार्डच्या बाहेरील धान्य नियमन मुक्तीचा निर्णय घेतला असून बाजार समितीचा सेस बंद करुन सेवाशुल्क आकारणी भरण्याबाबत निर्णय घेण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे बाजार समित्या बंद पडतील. काही बाजार समिती कर्मचाºयांचे १० ते २० महिन्यांपासून वेतन झाले नाही.तेलंगणा व तामिळनाडू राज्यातील बाजार समित्यांच्या कर्मचाºयांप्रमाणे राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाºयांची मुख्य मागणी आहे.भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, लाखनी व पवनी येथील मुख्य बाजार समितीचे कामकाज ठप्प पडले आहेत. याचा सरळसरळ फटका शेतकºयांना बसत आहे. प्रशासनीक कामेही पुर्णत: ढेपाळली आहेत. भंडारा जिल्ह्यातून आंदोलनात सहभागी होऊन कर्मचाºयांनी वरिष्ठांना निवेदन दिले. यावेळी भंडारा येथील सागर सार्वे, दिलीप गोन्नाडे, मंगेश चौधरी, विनोद तिडके, गजानन राठोड, राहूल बडोले, पवनी येथील सतीश तलमले, विनोद गायधने, देवानंद सुखदेवे, सुनिल गिरीपुंजे, तिलक करंजेकर, सुनिल पचारे, नरेश मडावी, वनवास कांबळी, तुमसर येथील रविकांत अवथरे, अनिल भोयर, धनपाल बिसने, हलमारे, लक्ष्मीकांम कोकोडे, सुरेश बोंद्रे, महेंद्र चौरीवार, अविनाश दुपारे, आशिष चौरे, भोजराज हारगुळे, मुकूल वासनिक, राजु बुराडे, लाखनी येथील संजय पारोडे, स्वप्नील गायधने, लोकेश मोटघरे, धनंजय बावनकुळे, किशोर भैसारे, चैतन्य वंजारी, विनोद तरोणे, बाळकृष्ण भोयर, गजानन मडावी यांच्यासह महिला कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :Marketबाजार