शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

कामबंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:57 AM

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देसंघटनांचा पाठिंबा : आरोग्य सेवा प्रभावित होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.दरम्यान, या आंदोलनाला आज आणखी काही संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या कामबंद आंदोलनात जिल्हाभरातील ५४० कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने आरोग्यसेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी मंडपाला भेट देऊन संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ११ महिण्याचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्या रेटून धरल्या. यावेळी डॉ.भंडारी यांनी आंदोलकांच्या मागण्या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र राज्यस्तरावर या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत समाधानकारक तोडगा निघू न शकल्याने आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. राज्यस्तरावरून कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाने ठोस निर्णय घेऊन मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघांच्यावतीने कामबंद आंदोलनात तालुका ते जिल्हास्तरापर्यंत कार्यरत अधिकारी कर्मचारी एकजुटीने सहभागी झाले आहेत. आरोग्य सेवेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नर्स, आरोग्यसेविका, आरोग्य सहायका, गटप्रवर्तक, वैद्यकीय अधिकारी जिल्हास्तरावरील अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. माजी आमदार मधुकर कुकडे, सभापती रेखा ठाकरे यांनी मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेण्याचे आश्वासन दिले. डॉ. प्रशांत उईके, डॉ.माधुरी माथुरकर, डॉ. किशोर चाचरकर, डॉ. रविंद्र वानखेडे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.गोयल, डॉ.निखील डोकरीमारे, राष्ट्रवादीचे देवचंद ठाकरे, शैलेश मयुर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पाठिंबा दर्शविला आहे.