शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

लाखनी तालुक्यात रोहयोअंतर्गत १२ हजार मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

विविध शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांना शासन आदेशाप्रमाणे फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर करीत कोरोनाबाबत उपाययोजना राबविण्यात येत आहे. बंधाऱ्याचे गाळ काढणे, खोलीकरणाचे काम करणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे कामाला गती : फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर, ३३१ कामांना सुरूवात

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : कोरोना संकटामुळे मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने आदेश दिले आहेत. या अंतर्गत स्थानिक पंचायत समितीस्तरावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाखनी तालुक्यात ३३१ कामे सुरु करण्यात आली असून या कामांवर १२ हजार ७० मजुरांनी उपस्थिती दर्शविली आहे.तालुक्यात मालगुजारी तलावाचे खोलीकरणाचे २२ कामे, भातखाचरे ४३ कामे, घरकुलाची २६५ व गोठा बांधकामाचे एक काम सुरु करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाल्याने मजूर वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. विविध शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांना शासन आदेशाप्रमाणे फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर करीत कोरोनाबाबत उपाययोजना राबविण्यात येत आहे. बंधाऱ्याचे गाळ काढणे, खोलीकरणाचे काम करणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. तालुक्यातील ७१ ग्रामपंचायती अंतर्गत ८६ हजार मजूरसंख्या आहे. प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याचा पंचायत समितीस्तरावर प्रयत्न केला जात आहे.तालुक्यात मालगुजारी तलावाच्या खोलीकरण, सामेवाडा ३९९, गराडा ५४४, रेंगेपार कोहळी ४५०, धाबेटेकडी ४५८, मांगली २५०, डोंगरगाव न्याहारवानी १७५, मोगरा ६५४, घोडेझरी २६९, देवरी २९९, खराशी ३१५, मासलमेटा ५४३, परसोडी ५०३, मुरमाडी तुप. ७००, कन्हाळगाव २९०, शिवणी ५९०, मिरेगाव ५४५, धानला २९०, किन्ही २७५ अशी तालुक्यातील कामांवर मजुरांची उपस्थिती आहे. बंधाºयातील गाळ काढण्याच्या कामावर खैरी येथे ४४० तर सेलोटी येथे ७००, केसलवाडा वाघ ९३१, निलागोंदी ५३७ असे कामांवर मजूर कामावर उपस्थित आहेत. भातखाचरांच्या कामावर इसापूर ३३, गुरठा ३०, रेंगोळा २०, मांगली १८, लाखोळी ११६, सालेभाटा ३५०, सावरी ३२, किटाडी १८, कवलेवाडा १२, कोलारी ४८, केसलवाडा २०, मुरमाडी ३०, झरप २०, डोंगरगाव ३५, दैतमांगली ३२, चान्ना ३१ अशा प्रकारे तालुक्यातील ४३ कामांवर ८४५ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी कठोर नियमांची अंमलबजावणी करीत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. उन्हाचा तडाखा वाढला असल्याने मजुरांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मजुरांनी मास्क ऐवजी रुमालाचा वापर करावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे रोहयो कामे सुरु झाली असून होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना व त्याच्या कुटुंबियांना कामावर न ठेवण्याच्या सूचना आहेत. क्वारंटाईन झालेला व्यक्ती १५ व्या दिवशी रोहयो कामावर उपस्थित राहू शकतो.-डॉ.शेखर जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी.

टॅग्स :Labourकामगार