शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

शेप महाबचत गटाविरूद्ध महिलांचा आक्रोश

By admin | Updated: October 25, 2016 00:22 IST

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून बकरीपालन व कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला.

मोरेश्वर मेश्राम एलसीबीत हजर : दिवसभर घडल्या नाट्यमय घडामोडीभंडारा : बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून बकरीपालन व कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला. यानंतर कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार आजतागायत भूमिगत झालेला मोरेश्वर मेश्राम आज स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाले. ही माहिती मिळताच शेकडो महिलांनी एलसीबीत धाव घेवून आक्रोश व्यक्त केला. दरम्यान आज या प्रकरणावरून दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या.महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याच्या नावावर मोरेश्वर मेश्राम यांनी महिला बचत गटांची निर्मिती करण्याची प्रेरणा दिली. हळूहळू या बचत गटांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली. दिवसागणिक त्याचे जाळे जिल्हाभर पसरले. हजारोंची लाखोत तर लाखोंची कोट्यवधीत उलाढाल करण्याच्या दृष्टीने मेश्रमा यांनी बकरी व कुक्कुटपालनाचा व्यवसाय महिलांना सांगितला. या माध्यमातून अल्पावधीतच आर्थिक उन्नती होण्याचे प्रलोभनही महिलांना देण्यात आले. मेश्राम यांच्या भुलथापांना बळी पडलेल्या महिलांनी या व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणुकही केली व सोबतच परिसरातील नागरिकांकडूनही पैसे गोळा करून ते मेश्राम यांच्या स्वाधीन केले. हा व्यवसाय त्यांनी भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली, चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यातही पसरविला. कालांतराने यात मोठा आर्थिक गैरव्यवहार करून मेश्राम यांनी बचत गटातील महिलांना 'तो मी नव्हेच' असे सांगून भंडारा येथून पसार झाला. घामाचा पैसा मेश्राम यांच्या स्वाधीन केल्याने व त्याची परतफेड न झाल्याने जिल्ह्यात महिलांमध्ये जनाक्रोश भडकला आहे. मागील अनेक दिवसांपासून मेश्राम यांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश आले नाही. मागील अनेक दिवसांपासून पसार असलेला मेश्राम आज स्थानिक गुन्हे शाखेत न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेवून पोहचला. याची माहिती महिलांना मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेत महिलांची तोबा गर्दी उसळली.यावेळी संतप्त महिलांनी स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या कक्षात बसलेल्या मोरेश्वर मेश्राम यांच्यावर शिव्यांची लाखोळी वाहिली. अनेकांनी संताप व्यक्त करून मेश्राम यांना मारण्याच्या धमक्या देत त्याला बाहेर काढण्याचीही विनवनी पोलिसांना केली. वाढत चाललेली गर्दी व आक्रोश बघता तिथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. दरम्यान उपस्थित नागरिकांनी त्याच्यावर आगपाखड करताना कोट्यवधींचा गैरव्यवहार करून कागदपत्रे दडवून ठेवण्याचा आरोपही लावला. यावेळी काही महत्वाची कागदपत्रे लपवून ठेवलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासणी केली. मात्र यात काय सापडले याबाबत वृत्त लिहेपर्यंत माहिती मिळू शकली नाही. (शहर प्रतिनिधी)