शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरण काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:07 IST

महिलांचे सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यांच्या सक्षमीकरण करण्याकरिता कायदेमंडळांनी बरेचसे कायदे केलेले आहेत.

ठळक मुद्देन्या.सय्यद : पवनी तहसील कार्यालयात जागतिक महिला दिन उपक्रम

आॅनलाईन लोकमतपवनी : महिलांचे सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यांच्या सक्षमीकरण करण्याकरिता कायदेमंडळांनी बरेचसे कायदे केलेले आहेत. जरी कायदा आला तरी महिलांचे पूर्णपणे सक्षमीकरण होत नाही. न्याय पालिकेला हस्तक्षेप करून महिलांना कसे सक्षमीकरण करता येईल याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयाबाबत पवनी न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. सय्यद यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय पवनी येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कोणत्याही समाजातील एखाद्या महिलेने आंतरजातीय विवाह केला तर वारसा हक्काने तिचा संपत्तीमधील हिस्स्यासंदर्भात मार्गदर्शन आणि न्यायालयातील विविध प्रकरणातील अनुभव तसेच पीडित महिलांना नुकसान भरपाई योजना कौटुंबिक हिंसाचार कायदा, महिलांनी मनोधैर्य वाढविण्याबाबत समाज जागृतीची आवश्यकता या संबंधी सविस्तर मार्गदर्शन न्यायाधीश सय्यद यांनी महिलांना केले. तहसीलदार गजानन कोकुड्डे नायब तहसीलदार नेटे, बालविकास प्रकल्प अधिकारी आर.आ. जाधव, खंडविकास अधिकारी तेलंग, गटशिक्षणाधिकारी घोडेस्वार, न.प. सदस्य अनुसया बुराडे, माजी पं.स. सभापती वैद्य, जायस्वाल, अ‍ॅड.भुरे, अ‍ॅड.गजभिये, अ‍ॅड.ए.एच. देशमुख, बचत गटाचे महिला प्रतिनिधी तसेच इतर क्षेत्रातील महिला प्रतिनिधी उपस्थित होते. अ‍ॅड.गजभिये यांनी प्रास्ताविक करून महिलांना मार्गदर्शन केले. अ‍ॅड.भुरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांना स्वातंत्र्य, समता, बंधूता यावर आधारित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेविषयी मार्गदर्शन करून महिला या समाजाचा महत्वाचा घटक असल्याचे सांगितले. तसेच महिलांसाठी वेगळे कायदे का केले जातात यावषियी देखील त्यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड.ए.एच. देशमुख यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा व पोटगी यासंबंधी मार्गदर्शन केले. खंडविकास अधिकारी तेलंग यांनी सांगितले की, महिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते त्यांनी त्यातून मार्ग काढावयास पाहिजे. महिलांनी सकारात्मक विचार करावयास पाहिजे. गटशिक्षणाधिकारी महिलांनी चुल व मुल पर्यंतच मर्यादित राहू नये तर त्यांनी आपले क्षेत्र वाढविण्यास पाहिजे तरच्या त्या आपला विकास करू शकतात. तहसीलदार गजानन कोकडे यांनी महिलांनी एकत्र येऊन लढावे व आपले प्रश्न मार्गी लावावेत असे सांगून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आभार प्रदर्शन रामटेके यांनी केले. यावेळी पवनी तालुक्यातील ८० ते ९० महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.