लाखनी : केंद्र सरकारच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ लाखनी तालुका काँग्रेस कमिटीने काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, लाखनी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू निर्वाण यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढून निषेध नोंदविला. ही भाववाढ केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावी व सामान्यांना सरकारने दिलासा द्यावा, यासाठी राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. लाखनी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. इंधनासह घरगुती गॅसचा केलेल्या दरवाढीचा निषेध नोंदवीत महिला कॉंग्रेसनेही चुली पेटविल्या. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहेत. अलीकडच्या काळात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस घेणे आता सामान्य लोकांच्या आवाक्यात राहिलेले नाही. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सर्वसामान्य लोकांना हे गॅस सिलिंडर परवडत नाही. इंधनाचे दर वाढल्यामुळे सार्वजनिक मालवाहतूकही महाग झाली आहे. खाद्यतेलांच्या किमतीदेखील प्रचंड वाढल्याने याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शफीभाई लद्धानी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष रवी भुसारी, महासचिव धनंजय तिरपुडे, ज्ञानेश्वर रहांगडाले, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, लाखनी शहराध्यक्ष पप्पू गिरेपुंजे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयकृष्ण फेंडरकर, आकाश कोरे, रूपलता जांभूळकर, माजी नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, अनिल निर्वाण, भोला उइके, पंकज शामकुंवर, सुनील पटले, घनश्याम देशमुख, मोनाली गाढवे, रघुनाथ आत्राम, विजय कापसे, सरपंच सुनीता भालेराव, मनोहर बोरकर, देवनाथ निखाडे, माजी शहराध्यक्ष विशाल तिरपुडे, सर्व सेलचे तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये, मोहन निर्वाण, मीनाक्षी बोपचे, रितेश कांबळे, राज गिरेपुंजे, भैरव सारवे, अनिल बावनकुळे, हेमंत बांडेबुचे, विकास वासनिक, योगेश झलके, भूपेश शेंडे, नितीन भालेराव, प्रदीप मेश्राम, छगन पाल, महेश शिवणकर, शाम बेंदवार, सुरेश वाघाये, संध्या धांडे, सविता गौरे, शाहीन पठाण, प्रिया खंडारे, सुनंदा धनजोडे, माधवी बावनकुळे, विना दोनोडे, अश्विनी भिवगडे, लीला उईके, दुर्गेश चोले, जितेंद्र दोनोडे, रामुदा अंबादे, योगेश गायधने, विलास तिरपुडे, अनिल बावनकुळे, महेश वनवे, सोहेल मेमन, नंदलाल चौधरी, चंदू फुंडे, सुनील आठवले, सचिन पचारे, तेजस खंडाईत, धीरज खंडाईत, अजय खंडाईत, अभिषेक खंडाईत, प्रतीक खंडाईत, अभिषेक तितिरमारे, नामदेव राऊत, संजीव रहांगडाले, हेमंत सेलोकर, राजेश सरोदे, मुनेश्वर वाघाडे, सुनील बांते, दिवाकर बांते, विक्रम लांजेवार, योगेश झलके, पुरुषोत्तम हेमणे, टिकाराम बांते, कैलास लुटे, सुनील पटले, कुंदन आगाशे, ऋषी बिसने, वसंता मेश्राम, वृंदा रोकडे, दामोदर लांजेवार, सुषमा चुटे, शोएब अंसारी, अल्पेश वालदे, राजेश बागडे, रवींद्र बावनकुळे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
130721\img-20210712-wa0025.jpg
काँग्रेस महिला कार्यकर्ता निषेध करताना