शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

दारू दुकानांविरूद्ध महिलांचा एल्गार

By admin | Updated: June 5, 2017 00:17 IST

तालुक्यातील खोकरला ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन इमारतींचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे.

अनधिकृत बांधकामाला विरोध : खोकरला ग्रामपंचायतीसमोर दोन तास ठिय्यालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील खोकरला ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन इमारतींचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. भविष्यात या इमारतींमध्ये दारूचे दुकान उघडणार असल्याने याला विरोध करून शनिवारी शेकडो महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या. परंतु, त्यावेळी सरपंच व सचिव गैरहजर असल्याने महिलांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर विस्तार अधिकारी व पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर पडदा पडला. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर दारू विक्रेत्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. खोकरला येथील गजानन नगरात दोन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम नियमबाह्य असून भविष्यात याठिकाणी दारू दुकाने सुरू होणार आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच व सचिवांची यात मोठी भूमिका आहे. दरम्यान, याची माहिती महिलांना होताच शनिवारी शेकडो महिलांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊराव बन्सोड यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. त्यावेळी सरपंच, सचिव व उपसरपंच अनुपस्थित असल्याने महिला संतप्त झाल्यात. जोपर्यंत सचिव व सरपंच तसेच प्रशासनाचे अधिकारी चर्चेसाठी येत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेत दोन तास ठिय्या मांडला. महिला संतप्त झाल्याचे पाहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तसेच तंमुसचे अध्यक्ष बन्सोड यांनी सचिव प्रमोद तिडके व सरपंचा नैलिला कोडापे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. तेव्हा सचिव सुटीवर असल्याचे सांगण्यात आले, तर सरपंचाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर भंडारा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. सदर प्रकार पाहता समस्यांवर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व सबंधित विभागाचे प्रशासनाचे अधिकारी यांचे सहकार्य मिळत नसल्याने व दोन तास होऊनही ग्रामपंचायतला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडण्याच्या तयारी करीत होते. दरम्यान भंडाऱ्याचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे यांना शिष्टमंडळाने माहिती दिली. दोन तास होऊनही चर्चेसाठी व निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही येत नसल्याने ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य करमचंद वैरागडे व अमृत सार्वे यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सचिव किंवा सरपंच यांचेशीच चर्चा करू अशी तटस्थ भूमिका घेतली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक कंकाळे यांनी महिला शिष्ठमंडळासोबत चर्चा करून सामंजस्याने प्रकरण संपुष्टात आणावे असे सांगितले. त्यानंतर विस्तार अधिकारी बी.के. बोदेले यांनी ग्रामपंचायतीत येऊन सबंधितांचे बांधकाम थांबविण्यात यावे, यासह इतर मागण्याचे निवेदन स्वीकारले. सबंधितांशी पाठपुरावा करून दोषीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गजानननगर येथे सुरू असलेल्या बांधकामाची सबंधितांनी ग्रामपंचायतकडून मंजुरी घेतली नाही. तरीसुद्धा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सदर इमारतीमध्ये बिअर बार सुरू होणार असल्याने याला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती खोकरला व महिला मंडळाचा विरोध आहे. खोकरला गावामध्ये दारूबंदी करण्यात आली आहे.सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. -भाऊराव बन्सोड, अध्यक्ष तंमुस सदर बांधकामाची सबंधितांनी ग्रामपंचायतची मंजुरी न घेता बांधकाम सुरू केले. त्यांचेविरूध्द ग्रामपंचायने ठराव घेवून कलम ५२ अंतर्गत कारवाई करावी तसेच त्यासाठी लागणारा सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करू.-बी.के. बोदेले, विस्तार अधिकारी, पं.स. भंडारा.