लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येक कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. कुटुंब सक्षम झाल्याशिवाय आपल्या कुटुंबाची प्रगती साधता येणार नाही. याकरिता कुटुंबातील महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अखिल सभागृह गणेशपूर येथे आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे होते. विशेष अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती विवेकानंद कुर्झेकर, वित्त व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर, बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रेमदास वनवे, समाजकल्याण समिती सभापती रेखा वासनिक, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या तथा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या राणी ढेंगे, चित्रा सावरबांधे, जया सोनकुसरे, गीता माटे, वंदना पंधरे, माधुरी हुकरे, पंचायत समिती सभापती बगमारे, धनंजय दलाल, कल्याणी भुरे, यशवंत भुरे व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, महिलांच्या उद्धारासाठी महिलांनीच पुढे येण्याची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रोजगार करण्याची गरज आहे. रोजगाराच्या संधी शोधून व्यवसायाकडे महिलांचा कल गेल्यास आत्मविश्वास वाढेल, दृष्टीकोण बदलेल व आपल्या कुटुंबासोबतच समाजाला नवी दिशा देता येईल असे सांगितले. सोबतच जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य दिव्य महिला मेळाव्याचे आयोजन करणाºया महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे यांनी केलेल्या उत्तम कार्याची त्यांनी या प्रसंगी प्रशंसा केली.खासदार मधुकर कुकडे म्हणाले, बचतगटाच्या माध्यमातून लघु उद्योगांच्या संधी शोधता येतात. यातूनच आपला कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करता येवू शकतो. छोट्या छोट्या बचत गटाच्या माध्यमातून मोठा उद्योग उभारल्या जावू शकतो. याकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा. लघु उद्योगापासून तर मोठा उद्योग करण्यासाठी महिलांनीच महिलांना प्रोत्साहीत करावे. सर्व महिला भगिनी व बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बालक व महिलांच्या हिताच्या विविध योजना महिला व बालविकास विभाग जबाबदारीने राबवित असल्याचे सांगून विविध पाककृतीची चव पाहता त्यांनी पोषण कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.सर्वप्रथम मेळाव्याचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच बचत गटाच्या महिलांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महिलांनी विविध कलांच्या माध्यमातून पारंपारिक लोककला, नृत्य, महिलांचे सुरु असलेले विविध विषय, स्त्री भ्रूण हत्या, महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, बेटी बचाव बेटी पढाव आदी विषयांवर सादरीकरण केले. हे सादरीकरण महिला मेळाव्याचे आकर्षण ठरले. महिला मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका महिला व बालविकास समितीच्या सभापती रेखा ठाकरे यांनी मांडली. प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी केले.मेळाव्याचे औचित्य साधून पुरक पोषण आहार प्रदर्शनी लावण्यात आली होती. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तर महिला मेळाव्याच्या माध्यमातून मेळाव्याला उपस्थित झालेल्या महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महिला मेळाव्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.
स्वयंपूर्ण कुटुंबासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:48 IST
प्रत्येक कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. कुटुंब सक्षम झाल्याशिवाय आपल्या कुटुंबाची प्रगती साधता येणार नाही. याकरिता कुटुंबातील महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
स्वयंपूर्ण कुटुंबासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गणेशपूर येथे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातर्फे महिला मेळावा