शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी स्वावलंबी होणे काळाची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:32 IST

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना स्त्री शिक्षणाची दिशा दिली, म्हणून आजच्या महिलांनी स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.

धोप येथे महिला मेळावा : चरण वाघमारे यांचे प्रतिपादन, सदस्यांचा सत्कारउसर्रा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना स्त्री शिक्षणाची दिशा दिली, म्हणून आजच्या महिलांनी स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.मोहाडी तालुक्यातील ग्राम धोप येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मोहाडी बीट जांब अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा धोपच्या प्रांगणात महिला मेळावा व बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्या मंजुषा गभने उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परीषद सदस्या राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य किरण भैरम, पं.स. सदस्या भाग्यश्री चामट, सरपंच मंगला पिकलमुंडे, सरपंच विद्या पटले, माजी उपसभापती खुशाल कोसरे, नरेंद्र पिकलमुंडे, जगदीश शेंडे, महेंद्र मेश्राम, जगदीश पंचभाई, प्रकल्प अधिकारी लांजेवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका गीता उईके, पोलीस पाटील सुरेश निमकर, ग्रामसेवक कावळे आदी उपस्थित होते.आमदार चरण वाघमारे म्हणाले, शासनातर्फे आता बचत गटातील महिलांना बिनव्याजी कर्ज देणार आहे. त्यामुळे महिला बचत गटासाठी आता सुगीचे दिवस आले आहे. या कार्यक्रमात पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, किशोरवयीन मुलीचे नृत्य, कलापथक आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकाद्वारे महिला जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार वाघमारे यांच्या हस्ते तंटामुक्त ग्रामद्वारे गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी लांजेवार यांनी केले. संचालन व आभार पर्यवेक्षिका गीता उईके यांनी मानले. (वार्ताहर)