शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना विविध उद्योग क्षेत्रात वाव

By admin | Updated: May 28, 2017 00:30 IST

महिला सक्षमीकरणाच्या युगात महिला बचत गटांनी उद्योगात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा.

उषा डोंगरवार यांचे प्रतिपादन: रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिला सक्षमीकरणाच्या युगात महिला बचत गटांनी उद्योगात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा. आज महिलांनी गृह उद्योगापासून मोठया उद्योगापर्यंत मजल मारली आहे. महिलांसाठी विविध उद्योगाचे द्वार खुले आहेत. जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक असून शेतीमध्ये लागणारे धान रोवणी ते कापणी या कालावधीत शेतीसाठी लागणारे यंत्र महिला बचत गटानी खरेदी करुन गरुजूंना यंत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिले तरी या गटांना आर्थिक उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र साकोलीच्या समन्वयिका डॉ. उषा डोंगरवार यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत प्रसार व प्रचार करण्यासाठी सुशिक्षित तरुण-तरुणी, रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा संचालित नाविदिषा लोकसंचालीत साधन केंद्र पवनी यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा लक्ष्मी रमा सभागृह पवनी येथे आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला माविमचे विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ, मत्स्य विकास सोसायटीचे प्रकाश पचारे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे, माविमचे लेखा अधिकारी, साधन गटाच्या अध्यक्षा छाया चव्हाण, संगिता श्रीरंग, पी.पी. पर्वते, वाळके, शिवरकर उपस्थित होते. डोंगरवार म्हणाल्या, स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापन महिलांनी आपल्या घरापासूनच करुन हा कचरा परसबागेत साठवल्यास त्याचे रुपांतर कंपोस्ट खतात होईल. खतामुळे झाडांना भरपूर फुले व फळे येतील. गांढूळ शेणाला खातात व त्यापासून सुध्दा उत्तम कंपोस्ट खत निर्माण होते. तसेच बैल गाई व म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी घरात गोबरगॅससाठी यांचा वापर करावा. सातबारावर पूरुषासोबत स्त्रियांचे नाव आले आहे म्हणजेच आपण आता मालक झालो. त्यामुळे त्या जमिनीच आरोग्य राखणे आपले काम आहे. जमिनीचे आरोग्य पत्रिका मिळावा. मातीचा मृदतपासणी करा, असे आवाहन त्यांनी केले.सोनकुसरे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उद्देश बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करुन देणे आहे. या द्वारे महिला बचत गट विविध उद्योग करुन शकतात. २ लाखाचे वरील कर्जासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, गुमास्ता, उत्पन्नाचा दाखला, बँक स्टेटमेंटची आवश्यकता आहे. मुद्राचे व्यवसाय प्रशिक्षण लाभार्थ्यांस देण्यात येते तसेच माहिती सुध्दा देण्यात येते. स्टॉर स्वयंरोजगार संस्थेत मोफत प्रशिक्षण घेवून उद्योग उभारावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी भारत सरकारच्या कृषि विभागाच्या निर्देशानुसार स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ, मत्स्य विकास सोसायटीचे प्रकाश पचारे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे आदींनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनातून शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास तालुक्यातील ८०० महिलांचा सहभाग होता. या रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता सबला नाविदिषा लोकसंचालित साधन केंद्राच्या सर्व सहयोगिनी, लेखापाल व कार्यकारिणी पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.