शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी पकडली दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:28 IST

अड्याळहून पाच कि.मी. अंतरावर विरली खंदार या छोट्याशा गावातील चौकात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची आणि देशी दारूची विक्री सुरू होती.

ठळक मुद्देदारूबंदीसाठी विरली येथील महिला सरसावल्या : पोलिसांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळहून पाच कि.मी. अंतरावर विरली खंदार या छोट्याशा गावातील चौकात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची आणि देशी दारूची विक्री सुरू होती. त्यामुळे गावातील महिला एवढे आक्रमक झाले आणि दारू विक्रेत्यांना यापूढे दारू विकणार नाही, असे पत्र त्यांच्याकडून लिहून घेतले.दारूच्या व्यसनामुळे घरात नेहमी होणाºया भांडणामुळे पाच-सहा महिलांना यापूर्वी जीव गमवावा लागला. गावात यापूर्वी तिनदा दारूबंदी होऊनही पुन्हा दारूविक्री झालीच कशी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याला ग्रामस्थ की अड्याळ पोलीस जबाबदार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विरली खंदार या गावातील एका महिलेच्या घरी व्यसनाधिन पतीने दारुच्या नशेत पत्नीला बेदम मारले. त्यामुळे संपूर्ण महिला व ग्रामस्थ एकत्र येऊन असा प्रकार गावात पुन्हा कोणत्याही महिलेबाबत होऊ नये, यासाठी गावातील दारुबंदी उपक्रम राबविण्यासाठी सुरूवात केली. येथील महिलांनी तीन दिवसात शेकडो लिटर दारू पकडून अड्याळ पोलीस ठाण्यात जमा केले. गावातील चौकात हा व्यवसाय एवढा फोफावला होता की, त्या ठिकाणी महिला व मुलींचे जाणे येणे सुद्धा कठीण झाले होते. कारण पिणारे व्यसनाधिन लोक एवढ््या बेफाट अपशब्दात बोलायचे की त्यामुळेच तिथून महिला मंडळी येजा करीत नसत. परंतु मुख्य मार्ग एकच असल्यामुळे नाईलाजास्तव जावे लागत राहिले. गावात शांतता राहावी, गावातील दारुबंदी समितीच्या महिला पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.यापूर्वीही दारुबंदीविषयी अड्याळ पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार केला होता. दोन महिन्यापूर्वी अपघात झाल्यामुळे मी बेडरेस्टवर आहे.-पदमा मेंढे, सरपंच विरली खंदार,गावातील दारुबंदीसाठी सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांचा सहभाग नव्हता. परंतु ग्रामस्थ व महिला मंडळाचा सहभाग होता.-रजनी मोडघरे, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती विरली खंदारअड्याळ पोलिसांचे सहकार्य लाभले. परंतु दारुबंदी समितीच्या महिलांना इजा झाली तर दारुबंदीसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल.-मंदाताई मोटघरे, ग्रामस्थ विरली खंदार