शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शौचालये वापराविना

By admin | Updated: December 29, 2014 23:38 IST

दुर्गम भागातील गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या. या योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधकामासाठी अनुदानही देण्यात आले.

भंडारा : दुर्गम भागातील गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या. या योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधकामासाठी अनुदानही देण्यात आले. मात्र उघड्यावर शौचास बसण्याच्या नागरिकांच्या सवयीमुळे अनुदानातून बांधण्यात आलेली शौचालये वापराविनाच उभी आहेत. स्वच्छतेबाबत शासकीय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी नंतरही ‘स्थिती जैसे थे’ असल्याचे दिसून येते. सकाळच्या सुमारास गावाबाहेरच्या रस्त्याने फेरफटका मारला असता ही बाब प्रकर्षाने जाणवते. शासनाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून नागरिकांसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली. एवढेच नव्हे तर अनुदानात वेळोवेळी वाढही करण्यात आली. त्यामुळे गावागावांत शौचालयाची संख्या वाढली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियाकडून शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते. आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्केपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावरच शौचविधी करतात, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले. योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली. योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर केंद्र शासनाने सन २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्राम योजना सुरु केली. २००५ मध्ये शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाला ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येऊ लागले. निर्मल ग्राम अभियानाची व्याप्ती सन २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. सन २००८ मध्ये जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय बांधण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील काही गावे हागणदारीमुक्तदेखील झाली. परंतु ग्रामीण भागामध्ये शौचालयाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे जिल्ह्यातील अनेक गावांच्या स्थितीवरुन दिसते. घरी शौचालय असताना बहुतांश नागरिक उघड्यावरच शौचविधी करीत असल्याने जिल्ह्याची परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात बदलली नाही. यामुळे आजही जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीत हागणदारी सुरु आहे.राज्य शासनातर्फे घरकूल योजना सुरु आहे. त्यामध्ये प्रत्येक घरकुलामध्ये शौचालय बांधणे बंधनकारक आहे. तेव्हाच या घरकुल धारकाला अनुदानाचा शेवटचा टप्पा मिळतो. मात्र अनेक लाभधारक शौचालय अनुदान घेऊन मोकळे झाले आहेत.वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या व्यक्तीला शासनाच्या योजनेतून १० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. शौचालय बांधणे प्रत्येक कुटुंबाला सक्ती केली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाला शासनाच्या योजना अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र देण्यास मनाई केली असल्याने नागरिक शौचालय बांधकामावर भर देत आहेत. शासनाच्या या निणर्याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)