शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरातच आंतरराज्यीय रस्त्यावरील पॅचेस उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:33 IST

एका आठवड्यापूर्वी तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. सदर पॅचेसची कामे करण्यात आली. सदर काही पॅचेस पुन्हा खड्डेमय झाले आहेत.

ठळक मुद्देतुमसर-कटंगी रस्ता : शहरातून जाणारा रस्ता धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एका आठवड्यापूर्वी तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. सदर पॅचेसची कामे करण्यात आली. सदर काही पॅचेस पुन्हा खड्डेमय झाले आहेत. शहरातील जुने बसस्थानक ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपर्यंतच्या मार्गावर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. शहरातून येथे आंतरराज्यीय मार्ग जातो. सदर कामाची चौकशी करण्याची तसदी संबंधित विभाग घेणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.३०० मीटरचा आंतरराज्यीय तुमसर-कटंगी रस्ता ठिकठिकाणी खड्डेमय झाला होता. खड्डे बुजविण्याचे सौजन्य संबंधित विभागाने घेतले. पॅचेसमध्ये गिट्टी भरून डामरीकरण करण्यात आले. आठ दिवसापूर्वी ही कामे करण्यात आली. परंतु काही ठिकाणी पॅचेसमधील गिट्टी बाहेर निघाली असून पॅचेस खड्डेमय झाले आहे. रात्रीला पॅचेस दिसत नाही. त्यामुळे दुचाकी वाहनचालकाचा अपघाताची शक्यता येथे बळावली आहे. तुमसर- कटंगी रस्ता अपघातग्रस्त ठरला आहे. मध्यप्रदेशातील कटंगीकडे हा रस्ता जातो. या मार्गावर मोठी जड वाहतुकीची वर्दळ राहते. क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतुकीमुळे रस्ता खड्डेमय होत आहे.कटंग रस्ता तुमसर शहरातून जातो. २४ तास येथे वाहतूक सुरु असते. जुना बसस्थानक ते रेल्वे टाऊन व आयटीआयपर्यंत रस्ता मोठा खड्डेमय झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या प्रक्रिया राबविली होती. सध्या पॅचेसमधील काळी गिट्टी बाहेर निघाल आहे. रस्ताभर ती पसरली आहे. परंतु संबंधित विभाग येथे अनभिज्ञ दिसत आहे.कटंगी मार्गे मॉईलची जड वाहतूक शिवाय खासगी शासकीय बसेस, हलकी वाहने, प्रवासी वाहने, रेतीचे ट्रक याच मार्गाने धावतात. जड वाहतुकीची ट्रक भरधाव येथून धावतात. त्यामुळे पॅचेसमधील गिट्टी इतर प्रवास करणाऱ्यांना धोक्याची ठरली आहे. सदर कामाची चौकशी संबंधित विभागाने करावी असा सूर सध्या शहरात उमटत आहे. रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने ये जा करतात. अपघात घडल्यास मोठा अनर्थ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.केवळ कामे केली जात असल्याचा देखावा केला जात आहे. शासकीय निधीचा गैरवापर होऊन निधी लाटल्याचा प्रकार कदापी खपवून घेतला जाणार नाही. उखडलेले पॅसेच तात्काळ खड्डेमुक्त न केल्यास शहरातील जडवाहतुकीस बंदी करण्यात येईल.-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.