शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कन्हाळगावच्या लेकींनी फडकविली विजयी पताका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:43 IST

निरंतर सराव, जिंकण्याची उर्मी, जिद्द अन् तेवढाच पालकांचा प्रोत्साहनाच्या बळावर कान्हळगाव (सिरसोली.) येथील नवप्रभात हायस्कुलच्या लेकींनी सतरा वर्ष वयोगटातील शालेय कबड्डी स्पर्धेत जिल्हा पातळीवर सलग दुसºयांदा विजयाची पताका फडकविली. मुलींच्या विजयाचे कौतूक गावभर केले गेले.

ठळक मुद्देकबड्डी स्पर्धेत सलग यश : जिद्दीने इतिहास घडविला, गावकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : निरंतर सराव, जिंकण्याची उर्मी, जिद्द अन् तेवढाच पालकांचा प्रोत्साहनाच्या बळावर कान्हळगाव (सिरसोली.) येथील नवप्रभात हायस्कुलच्या लेकींनी सतरा वर्ष वयोगटातील शालेय कबड्डी स्पर्धेत जिल्हा पातळीवर सलग दुसºयांदा विजयाची पताका फडकविली. मुलींच्या विजयाचे कौतूक गावभर केले गेले.आदर्श मंडळाच्या वारसाने मिळालेला कबड्डी खेळाचा उत्साह आजही टिकवला जात आहे. स्वर्गीय वामनराव ठवकर यांच्या मृत्यूनंतर आदर्श क्रीडा मंडळाचे अस्तित्वच संपले आहे. तथापि, कबड्डी खेळाचा वारसा नव्या पिढीने जपून ठेवला आहे. वर्षभर प्रतिकुल परिस्थितीतही खेळाचा सातत्य, सराव अन् प्रशिक्षणाच्या माध्यमातून कान्हळगाव येथील मुलींच्या कबड्डीची चमू घडत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवाजी स्टेडीयम भंडारा येथे जिल्हा स्तरावर खेळल्या गेलेल्या शालेय कबड्डी स्पर्धेत नवप्रभात हायस्कुल कान्हळगावचा दणदणीत विजय झाला. नवप्रभातच्या १७ वर्षीय मुलींच्या चमूने अंतिम सामन्यात प्रकाश हायस्कुल कारधा या संघाचा पराभव केला. मोहाडी तालुक्यातील शहरातील शाळांना मात देत ग्रामीण भागात कबड्डी खेळात कान्हळगाव मुलींच्या संघाने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. दुसºयांदा मिळालेल्या यशाचे कौतूक मुलींना खेळासाठी बळ मिळत आहे.या मुलींच्या जिद्दीची कहाणी जगावेगळी आहे. सकाळ व सायंकाळी प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर सराव हा नित्याचा भाग झाला आहे. तिनही ऋतूत कबड्डी खेळाचा सराव या मुली करतात. वर्षभरात केवळ दिवाळीच्या मोसमात आनंद घेण्यासाठी खेळाला सुटी देतात. पाऊस, थंडीच्या सरावात आड येत नाही. वर्षभर वेगवेगळ्या संकटांचा सामना करीत या मुली मागील दोन वर्षापासून तयार झाल्या. मागील वर्षी विभागीय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात या संघाला एका गुणाने राज्यस्तरावर जाता आले नाही. तरीही त्या सर्व मुलींनी निराश न होता जिद्दीने पुन्हा सरावासाठी उभ्या राहिल्या आहेत. त्याच भरवशावर या मुलींचा संघ जिल्हा पातळीवर अव्वल ठरला आहे. मोठ्या फरकाने विजय मिळवित मैदान गाजविला. आता चंद्रपूर येथे १८ सप्टेंबर रोजी होणाºया विभागीय स्तरावर खेळल्या जाणाºया स्पर्धेत कान्हळगावचा संघ सहभागी होणार आहे. १७ वर्ष वयोगटाच्या जिल्हास्तराचे नेतृत्व कर्णधार निकीता ठवकर करणार आहे. या संघात पूजा निंबार्ते, वैष्णवी पापडकर, काजल निमकर, सेजल सार्वे, पौर्णिमा शेंडे, पायल लिल्हारे, सानिका तिजारे, कीर्ती किटे, आचल निमकर, प्रतिक्षा कुथे या मुलींचा समावेश आहे. कबड्डी सामना बघण्यासाठी क्रीडा संकुल भंडारा येथे लेकींचे वडील, भाऊ, नातेवाईक, तरुण वर्ग उपस्थित होता. या मुलींना कबड्डीच्या प्रवाहात आणण्यासाठी गणेश ठवकर व राष्ट्रीय चॅम्पीयन राकेश ठवकर तसेच राकेश वहिले, राजू उपरकर यांचा मोलाचा वाटा आहे. कबड्डी स्पर्धेत विभागीय पातळीवर सलग दुसºयांदा झेप घेणाºया मुलींचे कौतूक मुख्याध्यापक मार्तंड कापगते, क्रीडा शिक्षक वेदांत साखरे, राजकुमार लिंगायत, देवेंद्र कोकुडे, वृंदा बांते, प्रतीक्षा बंसोडे, रोहिणी फेंडर, मुकेश वहिले, बाळू मारबते तसेच प्रकाश लिल्हारे, देवदास पापडकर, राजू धांडे, विजय शेंडे, जितेंद्र तांडेकर, मधू चवळे, नितेश झंझाड, रणजित शेंडे आदींनी केले.