शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गारांसह वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:35 IST

तुमसर शहरासह तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह व गारांचा पाऊस बरसला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावासामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तारांबळ : तुमसरात वीज पुरवठा ठप्प, मोहाडीतही वादळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरासह तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह व गारांचा पाऊस बरसला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावासामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून काहीअंशी सुटका झाली आहे. वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाऊस अर्धा तास सुरू होता.तुमसर तालुका व शहरात शनिवारी सांयकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. वारा सुरु झाला. त्यानंतर गारासह पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे सर्वत्र धुळच धुळ झाली होती. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना रस्ता दिसेनासा झाला. मागीलवेळेच्या गारपिटीचा अनुभव वाईट असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली.या पावसामुळे वऱ्हाड्यांची तारांबळ उडाली. अर्धा तास वादळी पाऊस सुरु असल्यामुळे वीज पुरवठा ठप्प पडला. अनेक ठिकाणी घरांचे व दुकानांचे टीनपत्रे उडाले. वीज तारा व उपकरणात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागातही वादळी पाऊस बरसला.सद्यस्थितीत सूर्य आग ओकत असून वातारणात प्रचंड उकाडा आहे. दिवसभर अघोषित संचारबंदी आहे. दुपारी १२ वाजेनंतर रस्ते निर्मनुष्य होतात. पावसानंतर पुन्हा उकाडा निर्माण होईल, अशी स्थिती आहे. उकाड्यामुळे वीज पुरवठा नियमित झाला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आंधळगाव परिसरात वादळी पाऊसआंधळगाव/मोहाडी : सकाळपासून सूर्य आग ओकत होता. पारा ४६ अंशावर पोहोचला होता. अंगाची लाहीलाही होत होती. घामाच्या धारा निघत होत्या. शेतकरी सकाळपासून शेतावर गेला नव्हता. रस्ते निर्मनुष्य होते. मात्र सायंकाळी ४.३० वाजता वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह, गारा व विजेच्या कडकडाटात पावसाने सुरुवात केली आणि गारवा निर्माण झाला. यापावसामुळे कोणतीही हानी झाली नाही. परंतु छोट्या-मोठ्या झोपड्यांचे नुकसान झाल्याची चर्चा होत आहे. पावसासह गारा पडल्यामुळे प्रवाशांना आपली वाहने वाटेतच थांबवून रस्त्याच्या कडेचा आश्रय घ्यावा लागला.