शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:55 IST

शनिवारला पहाटेच्या सुमारास तालुक्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत दोन तास बरसलेल्या पावसाने कापनी झालेली धान पिक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे धान उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देलाखांदुरला फटका : झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शनिवारला पहाटेच्या सुमारास तालुक्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत दोन तास बरसलेल्या पावसाने कापनी झालेली धान पिक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे धान उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.जून ते सप्टेंबर असे चार महिने मुक्काम ठोकणाºया पावसाने जुन महिण्याच्या पहिल्याच दिवशी आपली हुकुमत गाजवली आहे. दुपारी दोन वाजतापासून ढगाळ वातावरणाने मांडव धरला. रात्री १० वाजता दरम्यान दमट हवामानाने तालुका वासिय बेजार होत असतानाच सर्वत्र काळवंडून आले. दोनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. थोड्या-थोड्या वेळाने बरसणाºया या सरींनी तालुकावासीयांना झोडपून काढले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाने नागरिकांना धडकी भरविली.वादळी वाºयासह चौफेर बसरलेल्या पावसामुळे कित्येक घरांचे छप्पर उडाले तर मोठी झाडे पडल्याने घरांच्या नुुकसानीसह विजेचे तार तुटले. तालुक्यातील विहीरगाव येथे मार्तंड ढोरे यांच्या अंगणातील झाड पडल्याने शेजारी राहत असलेल्या सुनिल ढोरे यांच्या दोन गायी झाडाखाली सापडल्या.ही बाब वेळीच लक्षात आल्याने लगेच झाडाची कापणी करून गायींना सुखरूप बाहेर काढले. खैरीपट, मोहरना परीसरातील मोठी झाडे विजेच्या तारावर पडल्याने या परीसरातील वीज पुरवठा बंद पडला आहे.विजेचा लपंडावपावसाने नागरिकांना घरांमध्ये कैद केले असताना महावितरणनेही विजेच्या लपंडावाद्वारे त्यांना शॉक दिला. तालुक्याच्या बहुतांश भागात बत्ती गुल झाली. तालुक्यातील काही परिसरात रात्री दोन वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने महावितरण विभागाच्या कर्मचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागला, पडलेली झाडे बाजुला करून विजेचा बिघाड काढल्यानंतर शनिवारला दुपारी २ वाजता सुमारास वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला.