शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासासाठी ‘टिम भंडारा’ म्हणून काम करु

By admin | Updated: April 2, 2017 00:23 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी टिम भंडारा म्हणून काम करु या, ...

जिल्हाधिकारी सुहास दिवसे : डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप, नवीन जिल्हाधिकारी रुजूभंडारा : शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी टिम भंडारा म्हणून काम करु या, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासक म्हणून उत्तम काम केले असून त्यांचे नाविण्यपूर्ण उपक्रम या पुढेही सुरु राहतील, अशी ग्वाही सुहास दिवसे यांनी दिली. सुहास दिवसे यांनी आज जिल्हाधिकारी भंडारा म्हणून कार्यभार स्विकारला.डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप व सुहास दिवसे यांच्या स्वागताचा कार्यक्रम महसूल कर्मचारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीप डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर उपस्थित होते. यावेळी सुहास दिवसे म्हणाले की, विदर्भात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र वैदर्भिय माणसं प्रेमळ असल्याचा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असला तरी आपण सर्वांच्या सहकार्याने व सर्वांना सोबत घेवून भंडारा जिल्हयाच्या विकासाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. निरोपाला उत्तर देतांना डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच पदस्थापना असली तरी जिल्ह्याच्या विकासासाठी व शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. डॉ. चौधरी यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने आपल्या कामाची छाप जिल्ह्यावर सोडली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे म्हणाले की, जिल्हा परिषदेला त्यांचे नेहमी सहकार्य लाभले. शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण यासाठी डॉ. चौधरी यांनी जिल्हा परिषदेला मार्गदर्शन व सूचना तसेच मदत केली आहे. नवोदय विद्यालयासाठी जागा, महसूल कर्मचाऱ्यांची कालबध्द पदोन्नती, झुडपी जंगल, वन पट्टे, शंभर टक्के वसुली, वैनगंगेवरील जुन्या पुलावरील वाहतुकीस बंदी, शंभर टक्के वसुली, गोसेखुर्द पुनर्वसन सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदि कामे अभिजीत चौधरी यांनी यशस्वीपणे केल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, तहसिलदार वरुणकुमार सहारे, धनंजय देशमुख, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर राऊत यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अभिषेक नामदेव यांनी केले तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)