शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गणपती उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 11:29 IST

रेशनधारकांचा प्रश्न : अद्यापही दुकानदारांकडे शिधा पोहोचलाच नाही

अमोल ठवकर लोकमत न्यूज नेटवर्क पहेला : गौरी-गणपती सणाचा आनंद द्विगुणित हवा, यासाठी राज्य सरकारकडून प्राधान्य व अंत्योदय रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता. तशी घोषणा राज्य शासनाने यापूर्वीच केली आहे. यंदा गौरी मातेचा निरोप देण्यात येऊन गणेशोत्सव धडाक्यात सुरू आहे. परंतु, अद्यापही आनंदाचा शिधा वितरित झालेला नाही. यंदाच्या गणपती उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार की, पुढील सणाची प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न रेशन कार्डधारकांकडून विचारला जात आहे.

गणपतीच्या आगमनामुळे घराघरात चैतन्याचे वातावरण आहे. बाप्पासाठी नैवेद्याच्या रूपाने घरोघरी गोड पदार्थ तयार केले जातात. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सवाचे निमित्त साधून पात्र कुटुंबांना अवघ्या १०० रुपयात आनंदाच्या शिधा देण्याचा निर्णय घेतला. 

शासन चार जिन्नस मोफत देणार आहे. परंतु, पहेला परिसरात रेशन दुकानदाराच्या गोडाऊनपर्यंत आनंदचा शिधा पोहोचलाच नाही. गणपती उत्सवाचे चार दिवस उलटून गेले. आणखी किती वाट पाहायची, असा प्रश्न विचारला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेश उत्सव डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात चणा डाळ, तेल, साखर, रवा असे चार जिन्नस मिळणार आहेत. यात चणा डाळ एक किलो, सोयाबीन तेल एक लीटर, साखर एक किलो आणि रवा एक किलो मिळेल. राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांचा सण गोड व्हावा, यासाठी सरकार हा उपक्रम आहे. मात्र, यासाठी काही अटीसुद्धा आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे. 

तुम्हीच सांगा, कसा मिळणार गोडवा? एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली. आचारसंहितेमुळे दोन महिने आनंदाचा शिधा मिळालाच नव्हता. मात्र, गणेश उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार होता. परंतु, अद्यापही रेशन दुकानदारांच्या गोडाऊनपर्यंत आनंदाच्या शिधाची किट पोहोचली नाही. गणपती उत्सवात गोडवा कसा निर्माण होणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

१०० रुपयात आनंदाचा शिधा आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल ५६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना शंभर रुपये भरून सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार होता. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही आनंदाचा शिधा मिळणार होता. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024bhandara-acभंडारा