शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

भंडारा रोड रेल्वे स्टेशनच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: April 10, 2015 00:43 IST

भंडारा रोड रेल्वे स्थानकात असलेल्या समस्यासंदर्भात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत व रेल्वेचे विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.

वरठी : भंडारा रोड रेल्वे स्थानकात असलेल्या समस्यासंदर्भात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत व रेल्वेचे विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी प्रवाशांनी त्यांच्यासमोर समस्याचा पाढा वाचला. यावेळी अनेक संघटनानी निवेदन दिले. त्यावर खा.पटोले यांनी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा, प्रवाशी गाड्याचा थांबा, सुरक्षा व्यवस्था, रेल्वे स्थानक परिसराचे सौंदर्यीकरण यासह गावकऱ्याकरीता एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी आवश्यक असलेले फूटब्रिज आदी समस्या मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी रेल्वेचे नागपूर विभागाचे डी.आर.एम. आलोक कन्सल, मंडळ रेल्वे आरपीएफ आयुक्त डी.बी. गौर, वरिष्ठ डी.सी.एम. तन्मय मुखोपाध्याय, मंडळ अभियंता के.सी. शाहु, गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप झलके, मोहाडी पंचायत समिती सभापती विना झंझाड, जिल्हा परिषद सदस्य डॉ.उल्हास बुराडे, नगरसेवक सुर्यकांत इलमे, मंगेश वंजारी, रेल्वे कमेटीचे सदस्य विजय खंडेरा, सेवक कारेमोरे, तहसीलदार कल्याण डहाट, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव रघुते, चेतन डांगरे, विरेंद्र देशमुख, घनश्याम बोंदरे, सुरजभान चव्हाण, सुनिता बोंदरे, पुष्पा भुरे, विद्या भिवगडे, मिलिंद रामटेके, जि.प. सदस्य दिलीप उके, थारनोद डाकरे, एकनाथ फेंडर, आकाश काकडे, डॉ. आर.के. सिंग, विलास काकडे यांनी खासदार नाना पटोले यांच्यासमोर रेल्वे स्थानकावर असलेल्या समस्या मांडल्या. यात प्रवाशाच्या सुरक्षेसाठी या रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती, प्रवाशाकरीता प्लेटफार्म क्रमांक एक व दोनवर शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय आदी समस्यासह सायकल स्टॅन्डवर असलेल्या गर्दीमुळे होणाऱ्या अडचणी हे मुद्दे उपस्थित केले. या समस्या ऐकून खा.पटोले यांनी या रेल्वे स्थानकाच्या विकासाकरीता ७० लाख रूपये मंजूर झाले असून लवकरच प्रवाशी शेडचे बांधकाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय स्थानकातील समस्या सोडविण्याच्या सुचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. (वार्ताहर)