शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही तरी ‘रश्मी’ला न्याय मिळणार की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:21 IST

मुलीच्या संरक्षणार्थ कायदे असले तरी कायद्याच्या चाकोरीत मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? कायद्याचा मुलीच्या सुरक्षेसाठी उपयोग होतो का? कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस सजग आहेत का? असे विविध प्रश्न असले तरी मुलींना अपेक्षेप्रमाणे संरक्षण मिळत नसल्याचा प्रकार साकोली येथील रश्मी साखरे या मुलीशी घडला.

ठळक मुद्देतपास अपूर्णच : आरोपी पोलिसांना गवसलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मुलीच्या संरक्षणार्थ कायदे असले तरी कायद्याच्या चाकोरीत मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? कायद्याचा मुलीच्या सुरक्षेसाठी उपयोग होतो का? कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस सजग आहेत का? असे विविध प्रश्न असले तरी मुलींना अपेक्षेप्रमाणे संरक्षण मिळत नसल्याचा प्रकार साकोली येथील रश्मी साखरे या मुलीशी घडला. अखेर छळाला कंटाळून रश्मीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. रश्मीला जिवंतपणे न्याय मिळालाच नाही मात्र मृत्यूनंतरही न्याय मिळणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.रश्मी साखरे ही आत्यासोबत साकोली येथे राहत होती. अभ्यासात हुशार असून दिसायला सुंदर होती. स्वभावही मितभाषी होता. तिचे बीएससीपर्यंत शिक्षण झाले होते. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. अभ्यास करून नोकरी मिळवून समाजाची सेवा करायची तिची धडपड होती. मात्र काही कंटकांनी तिचे जगणे असह्य केले होते. या त्रासाला कंटाळून तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांनी रश्मीचे बयाण नोंदविले. त्यावेळी रश्मीने आत्महत्येचे कारण सांगून त्रास देणाऱ्यांची नावे सांगितली. पोलिसांनी रश्मीच्या बयाणावरून दोघा जणाविरूद्ध गुन्हा नोंदविला. मात्र आठ दिवसाचा कालावधी लोटूनही आरोपीचा पोलीस आरोपींना शोधू शकले नाही.तपास बदलला, पोलिसांवर दबावघटनेनंतर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांच्याकडे देण्यात आला. मात्र दोन दिवसापूर्वी पोलीस अधीक्षकांनी हा तपास वर्मा यांच्याकडून काढून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्याकडे दिला आहे. एका निष्पाप मुलीचा जीव गेला. घटनेला आठ दिवस लोटूनही तपास धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे पोलीस दबावात येऊन तपास करीत नाही ना? अशी चर्चा आहे.निवेदनातून आंदोलनाचा इशाराआठ दिवसापासून आरोपी पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे तपासाला गती यावी आणि तपास प्रामाणिकपणे व्हावा यासाठी कैलास गेडाम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. आरोपींना न शोधल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गेडाम यांनी दिला आहे. रश्मीला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आता काही सामाजिक संघटना एकवटल्या असून न्यायासाठी ते एकत्र येत आहेत.एका आरोपीचे आत्मसमर्पणया घटनेत सहभागी असलेल्या युवराज शहारे (३९) या आरोपीने बुधवारला साकोली पोलीस ठाण्यात स्वत:हून आत्मसमर्पण केले. याबाबत विचारले असता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी याबाबीला दुजोरा दिला.