शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावाची विकासाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:54 IST

एकीचे बळ कशाला म्हणतात हे जाणून घ्यायचे असल्यास लाखनी तालुक्यातील शिवणी येथे गेल्यावर त्याची प्रचिती येते. शिवणी ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची गावात अंमलबजावणी केली.

ठळक मुद्देशिवणी ग्रामपंचायत : राष्ट्रीय स्तरावर गावाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकीचे बळ कशाला म्हणतात हे जाणून घ्यायचे असल्यास लाखनी तालुक्यातील शिवणी येथे गेल्यावर त्याची प्रचिती येते. शिवणी ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची गावात अंमलबजावणी केली. या अंमलबजावणीतील गावाने विकासाकडे वाटचाल केली आहे. या वाटचालीत पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे.ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा आहे. तथापि ग्रामीण भागात अशुद्ध पाण्यामुळे, अस्वच्छ परिसरामुळे वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाºया या रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडीवारी पाहता हा उद्देश सफल झाल्याचे न जाणवल्याने त्यांचे आरोग्यमान पर्यायाने जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा शासनाच्या विविध योजनांची गावात अंमलबजावणी करण्याकरिता शिवणी ग्रामस्थांनी आता पुढाकार घेतला आहे. सन २०१५-१६ या वर्षापासून शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.शासनाच्या विविध योजना लोकसहभागातून व पारदर्शीपणे राबवून ग्रामपंचायतीला शासनाने विविध पुरस्कार दिले आहे. या लोकोपयोगी उपक्रमात येथील ग्रामपंचायत सदस्यांनीही हिरहिरीने सहभाग घेतला आहे. याचीच प्रचिती म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झालेल्या शिवणी गावाला राज्यस्तरीय चमूने भेट दिली. नागपूर विभागात शिवणी ही ग्रामपंचायत प्रथम असून आता तिचे राज्यस्तरावर नामांकन पक्के झाले आहे.गावाला भेट दिलेल्या समितीला राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच माया कुथे, उपसरपंच सतीश शेंडे, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास नागलवाडे, भीमराव खांडेकर, गीता शेंडे, रेखा लांडगे, रत्नमाला खांडेकर, मुख्याध्यापक राऊत, मुख्याध्यापक बोरकर, ग्राप. कर्मचारी सुखराम खांडेकर, रोजगार सेवक शेंडे, संगणक परिचालक शेंडे, आरोग्यसेवक, अंगणवाडी परिवेक्षीका, आंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुद्दटवार, पंचायत समिती लाखनीचे खंडविकास अधिकारी मिलिंद बडगे, विस्तार अधिकारी चकोले, राऊत आदींनी मार्गदर्शन केले.