शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अनाथ मुलींना देवदूत तारणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:20 IST

वडील पुरात वाहून गेले, आई काल देवाघरी निघून गेली. आता कुणाकडे पाहून जगायचे असा निरागस व तेवढाच हृदयस्पर्शी सवाल कोवळ्या मुलींच्या डोळ्यामध्ये ज्वालासारखा धगधगत होता.

लोकमत मदतीचा हात : आई-वडिलांचे छत्र हरपलेइंद्रपाल कटकवार भंडारावडील पुरात वाहून गेले, आई काल देवाघरी निघून गेली. आता कुणाकडे पाहून जगायचे असा निरागस व तेवढाच हृदयस्पर्शी सवाल कोवळ्या मुलींच्या डोळ्यामध्ये ज्वालासारखा धगधगत होता. ही वस्तूस्थिती आहे. भंडारा तालुकयातील पिंडकेपार (टोली) येथील जयश्री आणि ज्योती यांची आई वडीलांचे छत्र हरपलेल्या या दोन्ही अनाथ मुलींना कुणी देवदूत तारणार काय? दानशुर समोर येणार काय? असा प्रश्न निरुत्तरीत आहे.जीवनात वास्तव काय असते याची अनुभूती ही दोन्ही मुली अनुभवत आहे. जयश्री १३ वर्षांची तर ज्योती ९ वर्षांची आहे. पिंडकेपार टोली येथे चंद्रमोती झोपडीत राहणारे चांदेकर कुटूंबीय. शंकर दलपत चांदेकर असे घरमालकाचे नाव. १३ आॅगस्ट २०१३ ची गोष्ट. नित्यनियमाप्रमाणे शंकर हा रिक्क्षा घेवून भंडाऱ्याला आले. रात्री ८ वाजताच्या सुमारास परत येत असताना गणेशपूर पिंडकेपार पुलावर पाच फुट पाणी होते. रिक्क्षा घेवून पुल ओलांडू शकत नाही म्हणून पायी निघाले. पाण्याचा प्रवाह व अचाक वाढल्याने शंकर चांदेवार वाहून गेले. तीन दिवसांनी मृतदेह आढळला. घरचा कमावता आधार पुरुष अकस्मात निघून गेला. दोन मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी मृतक शंकर यांच्या पत्नी उर्मिला यांच्यावर आली. मोलमजूरी करुन उदरनिर्वाह सुरु होता. मात्र नियतीला कदाचित हेही मान्य नसावे ज्या मंगहवारी १३ आॅगस्ट २०१३ दिवशी बाबा गेले तोच मंगळवार दिवस या दोन्ही बहिणीसाठी काळा दिवस ठरला. उर्मिला शंकर चांदेकर याचा काल मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला. अठराविश्व दारिद्रय असलेल्या चंद्रमोळी झोपडीत पुन्हा डोंगर कोसळला.जयश्री ही बेला येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात आठव्या वर्गात तर ज्योती ही पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत आहेत. दोन वेळी पोट कसे भरायचे असा यक्ष प्रश्न उभा असतांना शिक्षण, भावी आयुष्य जगायचे कसे हा प्रश्न निरुत्तरीत आहे.दानशूर मिळेल का?कुणी दानशुर व्यक्ती, स्वयंसेवा संस्था, संघटनानी यासाठी पुढे येण्याची गरज आहे. ज्या दानशुरांना या अनाथ मुलींची मदत करायची असेल त्यासाठी खालील दिलेल्या बँकेच्या शाखेत मदत दिली जावू शकते. जयश्रीचे बँक आॅफ महाराष्ट्र गणेशपूर शाखेत खाते असून खाता क्रमांक (६०१४७४०७२२८) असा आहे.