शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करीत राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:20 IST

केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : चारभट्टी येथील हनुमान मंदिर देवस्थानात हनुमान चालीसा पठन, महाप्रसाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी ‘सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजीनामा देऊन, जिथे जाणार तिथे लाईन लावणार’ असे बोललो होतो. आपण बोललेला शब्द खरा ठरला आहे. येणारा काळ आपला आहे. राजकारणापलीकडे शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करणार आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.चारभट्टी/पुयार येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, स्वामी दिनेशानंद पाण्डेय, गोंदिया जिल्हा परीषद अध्यक्षा सीमा मडावी, सभापती मंगला बगमारे, सविता ब्राम्हणकर, विनोद पटोले, सीमा भुरे, राजू कारेमोरे, जेसा मोटवानी, चंद्रशेखर ठवरे, शेषराव गिरीपुंजे, रमेश पारधी, भारत खंडाईत, सरपंच निलेश नाकतोडे आदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, भाजपा सरकारने दरवर्षी एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे म्हटले होते. अजूनही रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. शेतकºयांच्या दीड पट हमी भाव आजपर्यत दिलेला नाही. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात पेटून उठले पाहिजेत. कोणत्याही कार्याची सुरवात या मंदिरातील पूजा आटोपून करत असतो. आपण या ठिकाणी जे बोलतो ते कृतीत उतरते असेही पटोले म्हणाले.खासदार मधुकर कुकडे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावले असून, शेतकºयांना सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी देवाने या सरकारला सदबुद्धी द्यावी. कार्यक्रमाच्या सुरवातीला हनुमान मंदिर देवस्थानात पूजा पाठ करून, हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर गायक मनीष सोनी यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार ते पाच हजार लोक उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन रामचंद्र राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक चांडक, सुभाष खिलवानी यांच्यासह नाना पटोले मित्र परिवाराने सहकार्य केले.