झबाटा येथील महिलांना मार्गदर्शन करताना, जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील इतरही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांशी संवाद साधताना कोणत्या सुविधा मिळत आहेत, या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासोबतच उमेद अभियानासाठी महिलांना स्वतंत्र इमारत कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी त्यांनी गोपाळा म्हणजेच भटक्या कुटुंबातील महिला व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून कोणकोणते व्यवसाय करू शकता, याबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासन आपल्याला त्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उमेद भंडारा तालुका व्यवस्थापक प्रिया सुखदेवे यांनी महिलांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील, सेंद्रीय शेती, तसेच कोरोना काळात केलेली मास्कनिर्मिती, तसेच झबाटा येथे उमेदचे पाच गट कार्यरत असून, दोन्ही गटांना आतापर्यंत फिरता निधी देण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी जबडा गावात फिरून उपस्थित चमूने पाहणी करून गावकऱ्यांची संवाद साधला. संचालन उमेदच्या भंडारा तालुका व्यवस्थापक प्रिया सुखदेवे यांनी केले, तर आभार वैशाली गौरी यांनी मानले.
महिला बचत गटांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST