शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:03 IST

जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर फिरत आहेत. जंगलातील पाणवठे चार महिन्यांपुर्वीच आटल्याने अनेक वन्यजीव पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातच अलीकडे बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणवठे आटले : वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर फिरत आहेत. जंगलातील पाणवठे चार महिन्यांपुर्वीच आटल्याने अनेक वन्यजीव पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातच अलीकडे बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.वन्यजीवांचा अभयारण्य शेजारी बफरझोनमध्ये तसेच पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर अनेक वन्यप्राणी एकत्र जमत असल्याने हिच ठिकाणे शिकाऱ्यांसाठी मोक्याचे ठरत आहेत. प्राणी चारा व पाण्याच्या शोधात शेतशिवारात व गावरस्त्यांकडे धुमाकूळ घालत असून वनविभागानी सजगता दाखविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य प्राण्यांच्या विविधतेने समृध्द आहे. तृणभक्ष्य प्राण्याबरोबर हिंस्त्र प्राण्यांची संख्या ही जास्त असल्याने येथे कृत्रीम पाणवठे तयार करण्याची गरज आहे.परंतु वनविभाग डोळे झाक करीत असून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वनविभागाची अत्यंत महत्वाची भुमिका आहे. ऐन उन्हाळ्याच्या पर्वावर प्राण्यांची भटकंती चिंताजनक ठरत आहे. पाणवठ्यावरील प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता बळावली आहे. अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या त्रासांमुळे शेतकरीही विद्युत करंटने प्राण्यांना मारल्याच्या घटना घडल्या आहेत.कोका अभयारण्याला लागून भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली तालुक्याच्या सीमा असून येथे मोठी वनसंपदा आहे.प्राण्यांचा रहिवास येथे कायम असल्याने अनेक ठिकाणी पाणवठे तयार करण्याची गरज वाढली आहे. परंतू जिल्हा प्रशासन देखील जैवविविधते संदर्भात ठोस उपाययोजना राबवित नसल्याने प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे.त्यामुळे चारही बाजुला वन्यजीवांचा बफर झोन परिसरात रहिवासी दिसून येतो. पाण्याच्या शोधात असलेले हरिण, रानडुकर, निलगाय हे गोसेखुर्दच्या खोल नहरात पडल्याने जखमी झाल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले असून जलाशयात असलेला जलसाठा अल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती दिवसेंदिवस वाढते आहे.वनांच्या आगीवर नियंत्रण आवश्यकदरवर्षीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे जिल्ह्यात वणवा लागता असल्याने अत्यंत दुर्मिळ असणाºया वनस्पतींसह प्राण्यांना धोका पोहचत आहे. तरी देखील वनविभागाकडून गावोगावी जनजागृती केली जात नाही. ग्रामस्तरावर असणाऱ्या वनसमित्या या फक्त केवळ नावालाच आहेत. त्यांच्याकडूनही कोणतीही विचारपूस अथवा वनकर्मचाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला दिसून येत नाही. अनेक गावात तर गावासाठी असणारा वनरक्षक गावकऱ्यांना परिचीत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे.