शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

पतीच्या तेरवी कार्यक्रमात पत्नीचा मृत्यू

By admin | Updated: October 19, 2015 00:42 IST

जन्म व मृत्यू कुणाच्या हातात नाही. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा विरह पत्नीला असह्य होत गेला आणि पतीच्या तेरवी कार्यक्रमाच्या दिवशीच ..

तुमसर : जन्म व मृत्यू कुणाच्या हातात नाही. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा विरह पत्नीला असह्य होत गेला आणि पतीच्या तेरवी कार्यक्रमाच्या दिवशीच पतीच्या विरहात पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. मनाला गहिवरून सोडणारी ही दुर्दैवी घटना तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथे रविवारी दूपारी १ वाजताच्या सुमारास घडली. जमनाबाई रामाजी शेंडे (७६) असे मृत महिलेचे नाव आहे.१३ दिवसांपूर्वी जमनाबाई यांचे पती रामाजी शेंडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. रामाजी शेंडे तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही ते सक्रीय होते. रामाजी शेंडे यांच्या तेरवीच्या कार्यक्रम रविवारी होता. कार्यक्रमानिमित्ताने नातलग तथा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते. स्वयंपाक सुरु होता. विधीनुसार कार्यक्रम एकीकडे सुरु होता. अचानक जमनाबाई यांना घाबरल्यासारखे जाणवू लागले. मुले, मुली, तथा उपस्थितांनी जमनाबाईची विचारपुस केली. मात्र जमनाबाई यांना तिव्र हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा काही वेळातच मृत्यू झाला. सर्वांना मायेची छाया देणारी जमनाबाई क्षणातच जग सोडून गेली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात ३ मुले, ३ मूली व मोठा आप्त परिवार आहे. जमनाबाई शेंद्र यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता माडगी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पतीसोबत आणाभाका घेणारी जमनाबाईने १३ दिवस एकाकी जीवन जगली. परंतु खऱ्या अर्थाने त्यानी साथ सोडली नाही असेच म्हणावे लागेल. या घटनेची संपूर्ण पंचक्रोशीत एकच चर्चा होती. (तालुका प्रतिनिधी)