शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा जाळून खून; पतीला आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:55 IST

पत्नीच्या अंगावर केरोसीन टाकून पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी पतीला आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा मंगळवारला सुनावली आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय : भंडारा तालुक्यातील पलाडी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पत्नीच्या अंगावर केरोसीन टाकून पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी पतीला आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा मंगळवारला सुनावली आहे.सुदेश मंगरू राऊत असे आरोपीचे नाव आहे. पलाडी येथील मालु चामलाटे हिचे १० वर्षांपूर्वी गावातीलच सुदेश राऊत याचेसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला ९ वर्षांची मुलगी व ६ वर्षाचा मुलगा आहे. परंतु सुदेश हा लहानलहान कारणावरून वाद करून मालुला नेहमी मारहाण करीत होता. २ नोव्हेंबर २०१५ च्या सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान मालुची मुलगा रिंकू हा रडत रडत आजीच्या घरी जावऊन वडिलाने आईला पेटविल्याचे सांगितले.त्यानंतर मालुची आई पंचफुला चामलाटे रा.पलाडी यांनी नातवासोबत मालुच्या घरी गेली असता घराच्या छपरीत मालुच्या अंगावरील कपडे हात, पाय, चेहरा, पोटाचा भाग जळालेला दिसून आला.त्यानंतर पंचफुला यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी विरूध्द भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले यांनी करून आरोपी सुदेश राऊत याला अटक केली. त्यानंतर आरोपीविरूध्द सत्र न्यायालय आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पांडे यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली.सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड.विश्वास तवले यांनी बाजू मांडून साक्षदार तपासले. गुन्ह्याचे स्वरूप व गांभिर्य लक्षात घेऊन आरोपी सुदेश राऊत विरूद्ध दोषसिध्द झाल्याने भादंवि ३०२ कलमान्वये आजन्म सश्रम कारावास व ५००० रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सिताराम ब्राम्हणकर यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.