शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट वापरण्याला तरुणींचा नकार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:44 IST

सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालवताना हेल्मेट वापरणे फारच गरजेचे आहे. परंतु आजही अनेकांना हेल्मेट हे ओझेच वाटते. तरुणीच्या बाबतीत विचारले तर त्यांना हेल्मेट अगदीच नको असते.

ठळक मुद्देदुचाकी सुसाट : पण हेल्मेटचा मात्र कंटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालवताना हेल्मेट वापरणे फारच गरजेचे आहे. परंतु आजही अनेकांना हेल्मेट हे ओझेच वाटते. तरुणीच्या बाबतीत विचारले तर त्यांना हेल्मेट अगदीच नको असते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. त्याचा दुचाकीवरचा वावरही वाढला आहे. पंरतु शहरातील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक होत असताना सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे सोडून तरुणीनी हेल्मेटलाच नाकारले आहे. याबाबत शहराचा अभ्यास केला असता पुरुषाच्या तुलनेत फारच कमी महिला वा तरुणी हेल्मेट वापरत असल्याचे निदर्शनास आले.म्हणे, सोबत बाळगायला त्रास जातो!आजच्या धकाधकीच्या जीवनात शहरी संस्कृतीमध्ये बरची कामे ही वाटून घेतली जातात. नोकरी करणाऱ्या स्त्रिया तर गाडी चालवतातच पण नोकरी न करणाºया स्त्रियादेखील अनेक कारणामुळे गाडी चालवताना आपण नेहमीच पाहतो. मग गाडी टू व्हीलर असो वा फोर व्हीलर... महिलाच गाडी चालविण्याचे प्रमाण पुरुषाप्रमाणेच वाढत आहे. पण तुलानात्मकदृष्ट्या गाडी चालवतान महिला या पुरुषापेक्षा कमी प्रमाणात हेल्मेट वापरतात. पण, त्याचा वेग मात्र कुठेही कमी नसतो, अशा स्थितीत अपघात घडल्यास मोठी इजा होऊ शकते. हेल्मेट हे वापरायला व बाळगायला सोपे नसते, हे अगदी मान्य परंतु या एका कारणामुळे हेल्मेट नाकारुन स्वत:चा जीव धोक्यात टाकणे हे शहानपणाचे लक्षण अजिबात नाही. याबाबत सदर प्रतिनिधीने शहरातील तरुणीच्या प्रतिक्रया घेतल्या तेव्हा त्यानीही हेल्मेटचे महत्व मान्य केले पण, कॉलेज, शिकवाणी वर्गास जायचे असल्यास हेल्मेट सोबत घेऊन फिरायला त्रास होत असल्याचे सांगितले.वाहन चालविताना हेल्मेट वापरणे गरजेचेखरतर प्रत्येकाचा जीव हा त्याला महत्त्वाचा वाटत असतो, मग ती महिला असो वा पुरुष, म्हणूनच गाडी चालवताना हेल्मेट हे वापरायलाच हवे. याबाबत महिलांना विचारले असता त्याविषयीची एवढी जागरुकता नाही, हेल्मेट ठेवायला आणि वापरायला संकोच वाटतो, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे.अनेक वेळा गाडी चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचे कुठे, हा प्रश्नच पडतो. पण कारणे काहीही असोत गाडी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, हे कुणीच विसरता कामा नये. हेल्मेट हे वाहन चालकाना अपघातापासून बचावात्मक सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे हेल्मेटचे महत्त्व आहे.विविध क्षेत्रात महिला कार्यरत असून देखील त्यांना हेल्मेट वापरणे योग्य वाटत नाही, जोपर्यंत स्वत:च्या मनातून हेल्मेट न वापरण्याचा विचार जात नाही. तोपर्यंत आपण हेल्मेट घालूच शकत नाही. त्यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यापेक्षा स्वत:च स्वत:ला सक्ती करणे आवश्यक आहे.-यशोधरा वासनिक, भंडारामी हेल्मेट वापरते, कारण मला गाडी चालवताना हेल्मेट घातल्यामुळे सुरक्षित वाटते, जर माझे नातेवाईक हेल्मेट वापरुन गाडी चालवू शकतात. तर मी देखील चालवू शकते. महिलांनी हेल्मेट घालून गाडी चालवल्यास अ‍ॅक्सिडेंटच्या त्रासातून आणि वेदनातून वाचता येऊ शकते.-पूनम शाहू, लाखनी