शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने गॅस सिलिंडरचे दर का वाढविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 21:55 IST

‘महिलाओं के सन्मान मे भाजप सरकार मैदान में’ असा नारा भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिला होता. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या सन्मानार्थ एकही काम केले नाही. एकीकडे महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे गॅस सिलिंडर आणि पेट्रोल व डिझेलची दरवाढ करुन गृहीणींना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्देवर्षा पटेल यांची प्रचार सभा : महिलांचा सन्मान केवळ मतांपुरताच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘महिलाओं के सन्मान मे भाजप सरकार मैदान में’ असा नारा भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिला होता. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या सन्मानार्थ एकही काम केले नाही. एकीकडे महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे गॅस सिलिंडर आणि पेट्रोल व डिझेलची दरवाढ करुन गृहीणींना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम करीत आहे. मोदी सरकारनेच आता गॅस सिलिंडरचे दर ८०० रूपयांवर का वाढविले याचे उत्तर द्यावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी तुमसर तालुक्यातील बपेरा,वाहणी, सिलेगाव, मोहगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. वर्षा पटेल म्हणाल्या, भाजप सरकार आघाड्यांवर अपयशी ठरले असून सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. कर्जमाफी आणि अनुदान देण्याच्या नावावर महिला आणि शेतकऱ्यांना रांगेत उभे करुन त्यांचा मानसिक छळ करण्याचे काम मोदी सरकारने केले. महागाई, बेरोजगारी अशी दुहेरी संकटाला जनतेला तोंड द्यावे लागत आहे. मोदी सरकारच्या जनहित विरोधी धोरणामुळे जनता त्रस्त झाली असून जनता या सरकारला धडा शिकवेल असे सांगितले. दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहून हात बळकट करण्याचे आवाहनही केले.