शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साकोली न.प.च्या उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

By admin | Updated: January 12, 2017 00:22 IST

राजकीयदृष्ट्या महत्वाची तथा खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या गावची नगरपरिषद म्हणून नावारुपास आलेल्या ...

स्वीकृत सदस्यपदांची तडजोड सुरुच : गटनेता म्हणून अनिता पोगळे यांची एकमताने निवडसंजय साठवणे साकोली राजकीयदृष्ट्या महत्वाची तथा खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या गावची नगरपरिषद म्हणून नावारुपास आलेल्या साकोली नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार ही उत्सुकता कायम असली तरी तीन नावाची चर्चा सध्या जोरात सुरु असून गटनेता म्हणून अनिता पोगळे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले आहे.साकोली नगरपरिषदेच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान भाजपाच्या धनवंता राऊत यांना मिळाला. या १७ सदस्यीय नगरपरिषदेत अकरा नगरसेवक भाजपचे, चार अपक्ष व एक काँग्रेस व एक राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक निवडून आले. ही नगरपरिषद साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गाव मिळून झाल्यामुळे दोन्ही गावांना तेवढेच महत्व आहे. मात्र अध्यक्ष धनवंत राऊत या सेंदुरवाफा या गावच्या असल्यामुळे उपाध्यक्षपदाचा मान हा साकोली या गावाला मिळाला अशी नागरिकांची ईच्छा असली. साकोली या गावाहून पुरुषापैकी जगन उईके व तरुण मल्लानी ही दोन नावे चर्चेत आहेत. तर पुर्वी भाजपला असलेला मान ऐनवेळी पक्षाणी उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवारी लढवुन निवडून येणारे पुन्हा भाजपात आलेले रवि परशुरामकर. उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत संध्या जगन उईके, तरुण मल्लानी व रवि परशुरामकर या तिघांची नावे चर्चेत असून यापैकी रवि परशुरामकर किंवा जगन उईके या दोघापैकी एकाची उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशी भाजपच्या गोट्यात चर्चा आहे. मकरसंक्रातीपुर्वी अध्यक्ष व नगरसेवक व अधिकारी या आपल्या पदभार सांभाळणार आहेत व त्यानंतर काही दिवसातच उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.स्वीकृत सदस्याचा वाद कायमसाकोली नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यापदी कोणाची वर्णी लागणार याच्यावर सध्यातरी शिक्कामार्तब झाला असले तरी अ‍ॅड. दिलीप कातोरे, सेंदुरवाफा येथील माजी उपसरपंच आनिक निबेकर, संताजी तेली समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. बापुसाहेब अवचरे, भाजपचे महामंत्री बंडु बोरकर, नितीन खेडीकर, ललीत खराबे, चंद्रकांत वडीचार यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी दोन भाग्यवंत कोण? हे लवकरच स्पष्ट होणार आहेत.गटनेतापदी पोगडेसाकोली नगरपरिषदेच्या गटनेतापदी माजी उपसरपंच किशोर पोगळे यांच्या पत्नी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असुन पोगळे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक ४ मधुन निवडून आल्या आहेत.