शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचे ‘ते’ डाग कुणी लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:04 IST

२४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. त्यावेळी त्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग होते. कोणतीही मारहाण केली नसताना रक्ताचे डाग लावून मला गोवण्यात येत आहे.

ठळक मुद्देचरण वाघमारे : मला गोवण्याचे षडयंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. त्यावेळी त्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग होते. कोणतीही मारहाण केली नसताना रक्ताचे डाग लावून मला गोवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत केली.यावेळी ते म्हणाले, माझ्या कार्यालयात चौरे यांना कुणीही मारहाण केली नाही. पोलिसांनी त्याला घेऊन गेल्यानंतर तो प्रकृती बरी वाटत नसल्याचे सांगितल्यामुळे त्याला उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले. त्यानंतर त्याला भंडारा जिल्हा रूग्णालयात पाठविले. दुसऱ्या दिवशी २५ जूनला दुपारी १२ वाजता आशिष चौरे भंडारा रूग्णालयातून तुमसरला जाण्यासाठी निघाला. त्यानंतर ३ वाजेच्या सुमारास पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत टी-शर्ट रक्ताने माखल्याचे दिसून आले. पत्रपरिषद संपल्यानंतर तो कुठे गेला, त्या रात्री कुठे होता, पत्रपरिषदेसाठी भंडारा रूग्णालयातून तुमसरात कुणाच्या परवानगीने आला. डॉक्टरांनी त्याला जाताना नोंदी घेतल्या का? २६ जूनला चौरेला पाहण्यासाठी माजी खासदार नाना पटोले गेले त्यावेळी तो रूग्णालयात होता. यासर्व प्रकरणात मला गोवण्यात येत असल्याचा आरोपही आ.वाघमारे यांनी केला.पोलिसांनी त्याला नेले त्यावेळी त्याला जखमा होत्या का? दुसऱ्या दिवशी त्याच्या टी-शर्टवर रक्त कुठून आले, ते रक्त कुणी लावले, याचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी करून ती टी-शर्ट फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून त्यातील सत्यता बाहेर यावी, अशी मागणीही त्यांनी केली.त्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई कराछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजने अंतर्गत ज्या शेतकºयांच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाही. अशा शेतकऱ्यांना बँकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यांच्याकडून कोणीही सक्तीची वसुली करू नये, असे शासनाचे निर्देश असतानाही बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकºयांना त्रास देणाऱ्या बँकेच्या अशा अधिकाºयांविरूद्ध कारवाई करण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले.