शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात करणाऱ्यांना अभय कुणाचे?

By admin | Updated: April 15, 2015 00:25 IST

अवैधरित्या गर्भपात करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतुद असताना साकोली तालुक्यात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : साकोली तालुक्यात गर्भपाताचे दोन बळीसंजय साठवणे  भंडाराअवैधरित्या गर्भपात करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतुद असताना साकोली तालुक्यात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न साकोली तालुक्यात दोन तरुणींचा नाहक बळी गेल्यामुळे निर्माण झाला आहे. याला शासन, प्रशासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला असून गर्भपात करणाऱ्यांना अभय कुणाचे? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. साकोली तालुक्यातील काही गावात अवैधरित्या गर्भपात करुन पैसे कमविण्याचा गोरखधंदा सुरु आहे. त्यासाठी एजंटची मदत घेतली जाते. मागीलवर्षी पिंडकेपार येथे गर्भपात करताना एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या महिन्यात सातलवाडा येथे दुसरी घटना घडली. या दोन्ही घटनांची पोलिस ठाण्यात नोंद आहे. मात्र यापुर्वी घडलेल्या अनेक गर्भपाताच्या प्र्रकाराची माहिती पोलिसांकडे नाही. अवैधरित्या गर्भपात करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. याची माहिती असुनही बोगस डॉक्टरांचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. सामान्य जनतेला या बोगस डॉक्टरांची माहिती असताना पोलीस, आरोग्य विभागाला त्यांची माहिती का मिळत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे या समस्येला वाचा फोडण्यासाठी जनतेनेच समोर येण्याची गरज आहे.गुप्तचर विभागाचे काय?पोलीस प्रशासनात गुप्तचर विभाग आहे. या गुप्तचर विभागाने जर अवैध गर्भपात करणाऱ्याकडे बारकाईने नजर टाकल्यास हा प्रकार घडणार नाही. शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन होणारे मृत्यूचे प्रमाण टाळता येऊ शकते.शासनाने महिलाच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची तरतुद केली असली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. साकोली तालुक्यात गर्भपात करण्याचा गोरखधंदा गुप्तपणे सुरू आहे. एखाद्या गावात असा प्रकार सुरू असल्यास त्याची गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार करावी. पोलिसांनी तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवून सहकार्य करावे. शासनाने अवैध गर्भपाताचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.- इंद्रायणी कापगतेमहिला समुपदेशक साकोली.साकोली परिसरात अवैध गर्भपात करणाऱ्यांची चौकशी आरोग्य विभगामार्फत करण्यात येत असली तरी गर्भपात गुप्तपणे केले जातात. यासाठी वापरण्यात येणारी औषधी कोणत्या औषधी दुकानातून व किती प्रमाणात खरेदी करण्यात आली याची चौकशी करण्याचे काम औषधी प्रशासनाचे आहे. या विभागाने चौकशी केली तर यावर नक्कीच आळा बसू शकतो. ज्या गावात असे प्रकार घडत असतील त्यांनी आरोग्य विभागांशी संपर्क साधावा त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.- डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवेतालुका आरोग्य अधिकार, साकोली.