शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लाच घेताना अन्न सुरक्षा अधिकारी गजाआड

By admin | Updated: June 16, 2014 23:19 IST

शीतपेय दुकानाची तपासणी केल्यानंतर मिळालेल्या नोटिसावर कारवाई टाळण्यासाठी अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याने सहा हजार रूपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना अशोक नागोराव आठवले या अन्न व सुरक्षा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : प्रकरण मिटविण्यासाठी मागितले पैसेभंडारा : शीतपेय दुकानाची तपासणी केल्यानंतर मिळालेल्या नोटिसावर कारवाई टाळण्यासाठी अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याने सहा हजार रूपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना अशोक नागोराव आठवले या अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भंडारा स्थित सदर कार्यालयात करण्यात आली. यामुळे परिसरात एकच हडकंप उडाला. माहितीनुसार, रामराज शालिकराम सार्वे यांची खात रोड मार्गावर रजनीनगर स्थित यशराज इंटरप्राईजेस नावा अंतर्गत शितपेयाची एजंसी आहे. दि.१३ मे २०१४ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्र.अ. उमप हे गोडावूनच्या तपासणीसाठी सार्वे यांच्याकडे आले होते. त्यात त्यांनी विविध मापदंडांतर्गत तपासणी करून त्रुट्यांची नोटीस बजावली. तसेच सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयात येऊन १४ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यासंदर्भात कळविले. यशराज इंटरप्राईजेसचे मालक व विक्रेता धनराज सार्वे यांचे लहान भाऊ रामराज सार्वे यांनी प्रकरणातंर्गत सहायक आयुक्त कार्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस दाखविले. त्यावर अन्न व सुरक्षा अधिकारी अशोक आठवले यांनी नोटीस वाचली. संबंधित इंटरप्राईजेसवर कुठलीही कारवाई न करण्यासंबंधीच्या उद्देशाने १५ हजार रूपयांची लाच मागितली. यावर तडजोडीनंतर आठवले यांनी सहा हजार रूपये देवून प्रकरण मिटविण्याचे सांगितले. त्याअंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रामराज सार्वे यांनी तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी करून आज सोमवारी संबंधित कार्यालयात सापडा रचण्यात आला. सार्वे यांच्याकडून सहा हजार रूपयांची रक्कम स्विकारताना अशोक आठवले यांना रंगेहात पकडण्यात आले. आठवले यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, नायक पोलीस अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, सचिन हलमारे, पराग राऊत, अश्विनकुमार गोस्वामी, मनोज पंचबुद्धे, शेखर देशकर, रसिका कंगाले, वाहन चालक मनोज चव्हाण यांनी केली. (शहर प्रतिनिधी)