शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना विस्तार अधिकारी जाळ्यात

By admin | Updated: August 28, 2014 23:34 IST

विद्यार्थीसंख्येची मान्यता वाढवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विस्तार अधिकारी रमेश जानबाजी गणवीर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर गुरुवाराला चार हजार रुपयांची

चार हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईभंडारा : विद्यार्थीसंख्येची मान्यता वाढवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विस्तार अधिकारी रमेश जानबाजी गणवीर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर गुरुवाराला चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.माहितीनुसार, तक्रारकर्त्यांचे लाखांदूर येथे वेदांत टंकलेखन विद्यालय आहे. या विद्यालयातील प्राचार्यांनी दि. ४ आॅगस्ट २०१४ रोजी विद्यार्थी संख्येची मान्यता वाढवून मिळण्यासंदर्भात जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी गणवीर यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गणवीर यांनी ७ आॅगस्ट रोजी संस्थेला भेट देऊन विद्यार्थी संख्या वाढीचा प्रस्ताव सकारात्मक सादर करतो, असे सांगून प्राचार्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. दि. ८ आॅगस्ट रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी विद्यार्थी प्रवेशक्षमता वाढविण्याचा सकारात्मक प्रस्ताव नागपूर शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविला. अहवाल सादर केल्यानंतर गणवीर याने तक्रारकर्ता यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून त्या पैशाची मागणी केली. दरम्यान, तक्रारकर्त्याने २७ आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर या विभागाच्या पथकाने गणवीर यांना पकडण्यासाठी सापळा रचला. आज गुरुवारी गणवीरला चार हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोेलीस निरीक्षक किशोर पर्वते, भातकुले, सहाय्यक फौजदार हेमंत उपाध्याय, युवराज उईके, अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, शेखर देशकर, सचिन हलमारे, मनोज पंचबुद्धे, लोकेश वासनिक, पराग राऊत, अश्विन गोस्वामी, रसिका कंगाले, वाहन चालक चव्हाण यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)