शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक होणार की नाही, संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या ३९ गटांसाठी निवडणूक होऊ घातली असून, मंगळवारी झालेल्या छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यात साकोली तालुक्यातील कुंभली आणि वडद येथील प्रत्येकी एक, भंडारा तालुक्यातील खोकरला दोन, पवनी तालुक्यातील चिचाळ गटातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आता ३९ गटांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष, तर १६३ महिलांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी निवडणूक होत असून, ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी जागा वगळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वघोषित कार्यक्रमानुसार घेण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, राजकीय नेत्यांनी आरक्षण नाही तर निवडणुका नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणूक होणार की नाही, असा संभ्रम या निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. सर्वांचे लक्ष आता शासनाच्या आदेशाकडे लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबर रोजी नागरिकांचा मागास प्रवर्गातील निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. विशेष म्हणजे या गण व गटातील नामांकनाची छाननीही करण्यात आली नाही. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षण नाही तर निवडणूक नाही, अशी भूमिका घेतली. ओबीसी क्रांती मोर्चाने तर निवडणुका झाल्या तर ओबीसी समाज बांधवांनी या निवडणुकीत मतदान करू नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सर्वच निवडणुकीला स्थगिती मिळणार काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मंगळवारी अर्जांची छाननी झाली. आता १३ डिसेंबरला उमेदवारी मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे; परंतु ऐनवेळी निवडणुकीला स्थगिती मिळाली तर आपला पैसा पाण्यात तर जाणार नाही ना, अशी भीतीही उमेदवारांना लागली आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांना मात्र ही निवडणूक व्हावी, असे मनोमन वाटत आहे. परंतु त्याच पक्षाचे नेते मात्र निवडणूक स्थगित करण्याची भाषा करत आहे.

जि. प. मध्ये सहा, तर पं. स. मध्ये ११ नामांकन रद्द- जिल्हा परिषदेच्या ३९ गटांसाठी निवडणूक होऊ घातली असून, मंगळवारी झालेल्या छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यात साकोली तालुक्यातील कुंभली आणि वडद येथील प्रत्येकी एक, भंडारा तालुक्यातील खोकरला दोन, पवनी तालुक्यातील चिचाळ गटातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आता ३९ गटांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष, तर १६३ महिलांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी निवडणूक होत असून, ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी, साकोली तालुक्यातील बोदरा, लाखनी तालुक्यातील कनेरी, भंडारा तालुक्यातील बेला, ठाणा, सावरी येथून प्रत्येकी एक, तर पवनी तालुक्यातील अड्याळ गणातून तीन तर आकोट व मांगली गणातून प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आता ७९ जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात असून, त्यात ३२० पुरुष आणि २२४ महिलांचा समावेश आहे.

१३ गटांमध्ये १०७ उमेदवारांचे नामांकन- जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या या १३ गटांमधून १०७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात तुमसर तालुक्यातून २२, मोहाडी १८, लाखनी ३९, भंडारा १२, पवनी तालुक्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक लाखनी तालुक्यातील ३९ उमेदवारांचा समावेश असून या तालुक्यातील चार गटांची निवडणूक स्थगित झाली आहे.

२५ गणातील १५७ उमेदवारांचा जीव टांगणीला- पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १५७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यात तुमसर तालुक्यात २९, मोहाडी २१, साकोली १९, लाखनी १४, भंडारा ३७, पवनी २१, लाखांदूर १६ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांनी नामांकन दाखल केले.  परंतु छाननीनंतर प्रक्रिया थांबली आहे. आता निवडणूक कधी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद