शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गवताच्या छताला व कुडाच्या भिंतीला घरकूल केव्हा मिळणार?

By admin | Updated: March 25, 2017 00:27 IST

गावात सहा वॉर्ड, अनेक रहिवासी शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत. मात्र, यातील अनेकांना केवळ वशीलेबाजी करून योजना मिळाल्या.

लाभले नाही पक्के घर : अनेकांना गवताच्या झोपडीचाच आधारविशाल रणदिवे अड्याळगावात सहा वॉर्ड, अनेक रहिवासी शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत. मात्र, यातील अनेकांना केवळ वशीलेबाजी करून योजना मिळाल्या. परंतु ज्यांनी वशिलेबाजी किंवा ज्यांचे कोणी वाली नाही. असे रहिवासी आजही चंद्रमौळी झोपडीत खितपत जीवन जगत आहेत. काही झोपड्या आहेत की, ज्यांना ना धड झोपायला जागा. ना जेवायला स्वच्छ जागा. पावसाळा आला की ताडपत्री गवतावर टाकल्याशिवाय पर्याय नाही. मग एखाद्या वर्षात आज पावेतो किती ताडपत्र्या आणल्या आणि फाटल्या पण वर्षापाठोपाठ वर्षे जात आहेत. काहींचे मुले मोठी व मोठी माणसे म्हातारी झाली. योजना किती आल्या नी, किती गेल्या. पण आजपावतो गवताच्या छताला व कुळाच्या भिंतीला घरकुल मात्र मिळाले नाही. आधी मातीचे घर होते. आता गवताच्या झोपडीत राहणारे या प्रशासनाविषयी काय विचार करत असणार हेही एक शोकांतिकाच नाही का?ज्याला पक्या घराची नितांत आवश्यकता आहे. अशांना आधी घरकुल मिळावे म्हणून येथील ग्रामपंचायत प्रशासन खरच प्रयत्न करते का? आणि प्रयत्न केले असते तर २० व्या शतकात गावात गवताच्या झोपड्या असत्या का? असा प्रश्न आपसूकच विचारल्या जात आहे.अड्याळ गावात असे काही कुटूंब आहेत की ज्यांना बाकीच्यांपेक्षा अतिआवश्यक आहेत. मग घरकुल यादीमध्ये यांना नंबर अजून सुद्धा घरमात्र आजही मिळाले नाही वा बनले नाही. आता ज्याचे कुणाचे घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर तयार होत आहे यांनी हे कसे केले असणार या प्रश्नात पडले आहेत.घर असावे घरासारखे असे म्हणतात परंतु इथे काहींचे आंगणही अंगणासारखे नाही तर घर कुठून घरासारखे दिसणार? योजना ही अतिगरजु लोकांना मिळावी म्हणून कोण अधिकारी किती प्रामाणिक काम पाहतो याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. एखाद्या गवताच्या ताळपत्री छतावर घालून त्याखाली राहणाऱ्या कुटूंबाला जर त्वरीत योजनेचा लाभ मिळत नसेल तर यापेक्षा शोकांतिका काय असणार? ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थांनाही अड्याळ मधील काही गवताच्या झोपड्या पाहून वाटते की याला त्वरीत घरकुल योजना लाभली पाहिजे. परंतु आजपर्यंत सर्वांना वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्या गवताच्या छताला व कुळाच्या भिंतीला नाही मिळाला पक्का आधार. गावात एक नाही तर अनेक परिवार अनेक वर्षापासून गवताच्या झोपडीत राहत आहेत. त्यांना पक्क्या घरांची आस लागली आहे. अशी मागणी राजु रोहणकर, राजु ब्राम्हणकर, राहुल फटिक, निरंजन देवईकर, कमलेश जाधव यांनी केली आहे. त्यांची मागणी पूर्ण होईल का