शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार कधी?

By admin | Updated: December 16, 2015 00:42 IST

तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे हस्ते २२ एप्रिल १९८८ मध्ये गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी झाली.

व्यथा : प्रकल्पग्रस्तांच्या जीवनातून हिरावले काळ्या मातीचे ममत्वपुरूषोत्तम डोमळे सानगडीतत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे हस्ते २२ एप्रिल १९८८ मध्ये गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी झाली. २००९ मध्ये गोसेखुर्दला केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३४ गावे पुर्णत: तर ७० गावे अंशत: बाधित झाली. बाधित २४ गावापैकी २८ गावाचे तीन टप्प्यात विविध ठिकणी पुनर्वसन करण्यात आले, मात्र एकमुस्त रकमेचा लाभ मिळालेला नाही.शासनाने फारच कमी भावाने श्ेतीचे आणि घराचे पैसे दिले आणि पुनर्वसन विविध ठिकाणी केले. पुनर्वसनाच्या ठिकाणी नागरी सुविधाचा अभाव सरकारी अधिकारी गावात येवून गाव सोडा गाव सोडा असा तगादा लावल्यामुळे लोकांनी गाव सोडले. काही लोकांनी पुनर्वसनाच्या ठिकाणी घरे बांधली तर काही लोक कामाच्या शोधात इतर ठिकाणी गेले. काही लोक कामाच्या शोधात वनवण भटकत आहेत. पिढ्यान पिढ्या काळया मातीसी आमचे नाते सख्या आईसारखे होते. रात्रंदिवस अहोरात्र तिची मशागत करून ज्वारी, बाजरी, सोयाबिन, गहू, तांदूळ आणि भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन करून आम्हा लोकांच्या जीवनात चटणी भाकरीचे दिवस सुखाचे होते. मात्र गोसेखुर्द धरणाने आमच्यावर आक्रमण केले आणि आता काळी आई दुरावल्याने मन गहीवरून येते अशा भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्यायभवन येथे झालेल्या शिबिरात भूमिहिन झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी दिल्या. १८ जून २०१३ ला गोसेखुर्द प्रकल्पाकरीता १९९९ ला ६० कोटीचे आर्थिक पॅकेज म्हणून मंजूर केले आहे. या पॅकेजमधून शसनाने नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कम २ लाख ९० हजार देण्याचे निश्चित केले. परंतु ज्यांचे नावे घर आहे असेच कुटूंब प्रमुखांनाच या रकमेचा लाभ देण्यात आला. परंतु काही कुटूंबाला व रिक्त भुखंडधारकांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला नाही. गोसेखुर्द संघर्ष समितीच्या संघर्षामुळे शासनानी १९ आॅगस्ट २०१५ ला शासकीय नियम काढून वाढीव कुटूंबांना व रिक्त भुखंड धारकांना तसेच गावात रहिवास करीत असल्याचा पुरावा दाखल केल्यास नोकरी ऐवजी एकमुस्त २ लाख ९० हजार रक्कम देण्याचे आदेशात नमुद केले. त्याअनुशंगाने २७ नोव्हेंबर २०१५ ला सामाजिक न्याय भवन भंडारा येथे प्रकल्पग्रस्ताने शिबिर घेण्यात आले. वाढीव कुटूंबाना नोकरी ऐवजी २ लाख ९० हजार एकमुस्त रक्कम देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. परंतु प्रस्तावात जाचक अटीमुळे असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त निराश झाले. कुटुंबात विवाहित तसेच मुलांची गणणा करावी. १९९६ पुर्वीचा पुरावा मागू नये, सरपंचाचा पुरावा ग्राह्य धरावा तसेच रिक्त भुखंडधारकांना व गाव रहिवासी असल्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना एकमुस्त रकमेचा लाभ द्यावा, अशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक आहे.