शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

दिघोरीतील मंजूर वीज रोहित्र केव्हा लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 00:53 IST

येथील शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी व पाण्याअभावी पिके नष्ट नयेत, यासाठी लाखो रूपये खर्चून शेतामध्ये बोरवेल, ...

दिघोरी (मोठी) : येथील शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी व पाण्याअभावी पिके नष्ट नयेत, यासाठी लाखो रूपये खर्चून शेतामध्ये बोरवेल, विहीरी व फिल्टरची कामे केलीत. तसेच जवाहर रोजगार योजनेच्या माध्यमातूनही अनेक विहीरीचे बांधकाम पूर्ण झाले मात्र विज मंडळाच्या डोळेझाकपणामुळे अजुनही शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा होऊ शकला नाही.दिघोरी (मोठी) येथे सहा नवीन ट्रॉन्सफॉर्मर मंजूर झाले असल्याचे विज मंडळाचे कर्मचारी व अधिकारी मागील सहा महिन्यांपासून सांगत आहेत. जवळपास पन्नासचेवर शेतकऱ्यांनी वीज जोडणीचे डिमांड भरले आहे. काहींनी तर मागील सहा महिन्यांचे अगोदरपासून डिमांड भरलेला आहे, असे असले तरी अजूनपर्यंत ट्रॉन्सफॉर्मर लावण्यासाठी वीज मंडळाद्वारे प्रयत्न चालले असल्याचे दिसून येत नाही.मागेल त्याला शेतीच्या सिंचनासाठी विज द्या व तेही अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत विज पुरवठा करा, असे आदेश उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व विज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असले तरी वीज विभागाचे अधिकारी ऊर्जामंत्र्यांचे आदेशाची पुर्तता करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे काम कमी व आराम जास्त करण्यातच वीज मंडळाचे अधिकारी व्यस्त असल्याचे दिसून येते.दिघोरीतील अनेक ट्रॉन्सफॉर्मर ओव्हरलोड असल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाची वीज पुरवठा होऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारपंपाचे बरेच नुकसान होत आहे. मध्येच कमी दाबाचा विज पुरवठा झाल्यास अनेक शेतकऱ्यांच्या मोटारपंप जळाले त्यामुळे बराच मोठा आर्थिक ताण विज मंडळामुळे शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. प्रत्येक आठवड्यात किमान तीन-चार मोटारपंप विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे जळत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उपमुख्य कार्यकारी अभियंता साकोली यांना भ्रमणध्वनीद्वारे ट्रॉन्सफॉर्मरबाबत माहिती विचारली असता भ्रमणध्वनीवर माहिती देण्यास त्यांनी चक्क नकार दिला. माहिती हवी असल्यास कार्यालयात यावे, असे सांगितले. एकंदरीत वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे. (वार्ताहर)