शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना इसम जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:32 IST

नमूद गुन्ह्यातून बाहेर काढण्याकरिता तपासी अधिकाऱ्यांची ओळख आहे असे सांगून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका इसमाला आज रंगेहाथ पकडण्यात आले.

साकोली पोलीस ठाण्यातील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : नमूद गुन्ह्यातून बाहेर काढण्याकरिता तपासी अधिकाऱ्यांची ओळख आहे असे सांगून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका इसमाला आज रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीकृष्ण केवळराम माहुरे रा.चारगाव असे या लाचखोर इसमाचे नाव असून ही कारवाई आज साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडाराने साकोली पोलीस ठाण्यात माहुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हा विद्यार्थी असून परसटोला येथील रहिवासी असून त्यांच्या मामेभावाविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी मामेभावाला २६ जून २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तक्रारदार हे पोलीस ठाणे साकोली येथे गेले असता तेथे उपस्थित असलेले श्रीकृष्ण केवळराम माहुरे याने तक्रारदाराला मी भ्रष्टाचार निर्मूलन समिती साकोलीचा सदस्य असून संबंधित प्रकरणातील तपासी अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराला प्रलोभन देऊन त्यांच्या मामेभावाला नमूद गुन्ह्यातून बाहेर काढण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच मागितली. माहुरे याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा याच्याकडे करण्यात आली. तक्रारीच्या संदर्भाने शहानिशा करून मंगळवारला कारवाईच्या दृष्टीकोनातून सापळा रचण्यात आला. यात श्रीकृष्ण माहुरे याला १५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. साकोली पोलीस ठाण्यात कलम ८ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये माहुरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक डुडेश्वर पारधी, पोलीस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, शेखर देशकर, अमोल खराबे यांनी फत्ते केली.