शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केव्हा?

By admin | Updated: November 24, 2015 00:43 IST

सद्यस्थितीत धान कापणी व मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. शेतकऱ्यांनी गेले सहा महिने काबाडकष्ट करून धान पिकविले.

धान उत्पादक शेतकरी संकटात : ‘खर्चा रुपय्या, कमाई अठण्णी’ अशी स्थितीहरिश्चंद्र कोरे विरली (बु.) सद्यस्थितीत धान कापणी व मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. शेतकऱ्यांनी गेले सहा महिने काबाडकष्ट करून धान पिकविले. मात्र, यासाठी झालेला उत्पादन खर्च आणि मिळालेले उत्पन्न यांचा जमाखर्च मांडताना ‘खर्चा रुपय्या आणि कमाई अठण्णी’ अशी अवस्था झाली आहे. राज्य शासनाने एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शासनाला मुहुर्त सापडलेला नाही. ही ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. संकटे ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी कधी किडींचे आक्रमणामुळे धान उत्पादकांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. परिणामी शेतकऱ्यांच्या कर्जाचे ओझे वाढत आहे.यावर्षी अपुरा पाऊस आणि विविध किडींच्या आक्रमणामुळे धानाच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ तर उत्पादनात कमालिची घट झालेली आहे. परिणामी शेतकरी वर्गाला आपल्या जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे कठीण झाले आहे. वाढलेला उत्पादन खर्च व कमी हमीभावामुळे धान शेती परवडेनाशी झाली आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी आपली शेती बटईने देण्याचा मार्ग चोखाळला आहे. काही धाडसी शेतकरी शेती विकून आलेल्या रकमेच्या व्याजातून प्रपंच चालवित आहेत. शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था असताना शेतकऱ्यांचे कैवारी गप्प बसले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी २००४ मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापन करण्यात आला. आॅक्टोबर २००६ मध्ये या आयोगाने शासनाला अहवाल सादर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिफारसी सुचविल्या. त्यामध्ये उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफा मिळेल, एवढा शेतीमालाचा हमीभाव असावा, अशी शिफारस करण्यात आली. त्यानंतर २००८ ला कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि आता कर्मचाऱ्यांची बोंब नसताना शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे.मागील ९ वर्षापासून मागे पडलेला स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे धाडस सरकारने दाखविले नाही. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींकडे डोळेझाक केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या चर्चा करुन प्राप्त आकडेवारीनुसार यावर्षी धानशेतीसाठी प्रती एकर सुमारे १७ ते १८ हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले. मात्र ३-४ महिने काबाडकष्ट करून शेतकऱ्यांच्या हातात जेमतेम १४ ते १५ हजार रुपयापर्यंत उत्पादन आल्याची वस्तुस्थिती आहे.