शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत दर घसरताच पेट्रोलपंप होतात बंद

By admin | Updated: January 18, 2015 22:40 IST

शहरात भारत व इंडियन कंपनीचे असे दोन पेट्रोलपंप आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर हे पेट्रोल पंप बंद होत नाही. मात्र भाव कमी झाले तर दोन्ही पेट्रोलपंप दिवसभरासाठी किंवा दोन

मोहाडी : शहरात भारत व इंडियन कंपनीचे असे दोन पेट्रोलपंप आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर हे पेट्रोल पंप बंद होत नाही. मात्र भाव कमी झाले तर दोन्ही पेट्रोलपंप दिवसभरासाठी किंवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात येतात. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करवा लागतो. यावर प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा, अश्ी मोहाडी व परिसरातील वाहनधारकांची मागणी आहे.मोहाडी शहरात भारत पेट्रोलियमचा शहराच्या मधोमध राज्यमार्गावर पेट्रोलपंप आहे. तर इंडियन पेट्रोलियमचा पेट्रोलपंप हा शहराच्या बाहेर एमआयडीसी जवळ राज्यमार्गावर आहे. पेट्रोल, डिझेलचे दर १६ जानेवारीला मध्यरात्रीपासून कमी झाले. त्यामुळे हे दोन्ही पेट्रोलपंप १७ जानेवारीला सकाळपासूनच बंद करण्यात आले होते. मात्र यामुळे वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. आजकाल प्रत्येकाच्याच घरी दुचाकी आहेत. सगळी कामे दुचाकीनेच केले जातात. ग्रामीण भागात अनेकजण दररोज ५० किवां १०० रुपयाचे पेट्रोल भरतात तर शेतकरी आपल्या ट्रॅक्टरमध्ये एक दोन दिवस पुरेल इतकेच म्हणजे ते दहा लिटर डिझेल टाकतात. त्यामुळे येथील पेट्रोल पंपावर दररोज गर्दी असते. आवश्यक तेवढेच पेट्रोल, डिझेल वाहनात घालत असल्याने एखादवेळ पेट्रोल पंप बंद असल्यास अश्या वाहनधारकांची मोठी पंचाईत होते. १७ जानेवारीलाही असेच काहिसे घडले. काहिंना आरोग्य केंद्रात जायचे होते तर काहिना अतिआवश्यक कामासाठी बाहेरगावी जायचे होते. त्यामुळे हे वाहनधारक पेट्रोलपंप धारकांला विणवणी करत होते. मात्र पेट्रोलपंप धारकांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही आपले नुकसान कसे करणार असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत होते.दुपारनंतर इंडियन कंपनीच्या पेट्रोलपंप सुरु करण्यात आला. मात्र तो शहराच्या बाहेर असल्याने अनेकांना त्याची माहिती मिळाली नाही. मात्र भारत पेट्रोलीयमचा पेट्रोलपंप सायंकाळपर्यंत सुरु करण्यात आला नाही. भारत पेट्रोलपंपावर नागरिक सुविधांचा अभाव आहे. या पेट्रोलपंपावर छत नाही, शौचालय, मुतारी घर आहे पण तो बंद स्थितीत आहे. हवा भरण्याची मशिन नादुरुस्त आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. फक्त एक माठ ठेवले आहे. तेही शुध्द नाही. पेट्रोलपंपधारक दर वाढल्यास पेट्रोलपंप बंद करीत नाही. मात्र दर कमी होताच पेट्रोलपंप एक ते दोन दिवसासाठी बंद करण्यात येते. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालुन वाहनधारकांची होत असलेली कुंचबना थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)