शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहीर लाभार्थ्यांना अनुदान केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:17 IST

धडक सिंचन अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शासनाने मंजूर केल्या, विहिर लाभार्थ्यांनी काही रक्कम स्वत: जवळून खर्च केली,....

कोष्टी येथील विहिरीचे प्रकरण : अधिकारी म्हणतात, चौकशी होणारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : धडक सिंचन अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शासनाने मंजूर केल्या, विहिर लाभार्थ्यांनी काही रक्कम स्वत: जवळून खर्च केली, उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही. येथे ग्रामपंचायतीने विहिरीकरिता साहित्य दिले होते. तर विहिर बांधकामकरिता लाभार्थ्यांनी रक्कम खर्च केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.तुमसर तालुक्यातील कोष्टी व बाम्हणी येथे धडक सिंचन विहिर उपक्रमांतर्गत विहिरींचे बांधकाम करण्यात आले. यात अनुरता ईस्तारु कहालकर (बाम्हणी) ६१,६७९ रुपये, संपत आत्माराम पंचबुध्दे कोष्टी ४८ हजार, सुनिल परसराम आस्वले कोष्टी ६० हजार, लक्ष्मीबाई दयाराम आस्वले कोष्टी ५७८६१ रुपये, सुरेश माधो पवनकर कोष्टी ६५ हजार, भाऊलाल शेंडे कोष्टी ४० हजार यांनी शेतात विहिरी तयार केल्या. त्यांना विहीरींचे अनुदानाची राशी देण्यात आली. ४० ते ५० फूटावर विहिरीत पाणी लागले. विहिर बांधकामाचे साहित्य संबंधित ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिले होते.विहिर बांधकाम मजूरीचे रुपये लाभार्थ्यांनी स्वत:जवळील दिले. सुमारे एक ते सव्वा लक्ष मजूरी येथे लाभार्थ्यांनी दिली. शासनाकडून विहीर बांधकामाकरिता ३ लक्ष मंजूर केले जाते. जशी विहिरींचे बांधकाम केले जाते तसे अनुदान राशी लाभार्थ्यांना देण्यात येते. विहिरींचे बांधकाम झाल्यानंतर लाभार्थ्यांनी उर्वरित रकमेची मागणी केली,पंरतु त्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत अनुदान प्राप्त झाले नाही.येथे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. लाभार्र्थ्यांनी तुमसर येथील खंडविकास अधिकाऱ्यांना याप्रकरणी तक्रार केली. परंतु अजूनपर्यंत काहीच झाले नाही. खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. शेतीकरिता पैसा लागतो. येथे स्वत:जवळील रक्कम शेतकऱ्यांनी खर्च केली आता काय करावे, अशी चिंता आहे.कोष्टी, ब्राम्हणी येथील विहीरींचे प्रकरणाची चौकशी भंडारा येथील वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. तुमसर येथील खंडविकास अधिकाऱ्यांचा प्रभार मुद्रण करुन केवळ चार ते पाच दिवस झाले आहेत. त्यामुळे सविस्तर माहिती देता येणार नाही.- एस. एन. गायधने,प्रभारी खंडविकास अधिकारी तुमसर