शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तर कसा होणार उदयोन्मुख खेळाडूंचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:22 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे.

ठळक मुद्देआज राष्टÑीय क्रीडा दिवस : निधीची वाणवा कायम

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे. क्रीडांगण अथवा मैदान आहे पण सुविधा नाही, अशी वस्तुस्थिती आहे. खेडाळूंचा विकासापेक्षा अधिकाºयांचाच विकास झाला काय? असे स्पष्ट क्रीडापटू व क्रीडाप्रेमी बोलु लागले आहेत. राष्टÑीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही क्रीडागंणाची व्यथा. सदर क्रीडा संकुल नावापुरते असून क्रीडा सुविधांचा येथे प्रचंड वाणवा आहे. निधीची बोंब कायम असल्याने विकास कसा करावा असा युक्तीवाद क्रीडा अधिकारी नेहमी करतात. राज्य शासनानेही क्रीडा संकुलाच्या विकासाबाबत गांभीर्य दाखविले नाहीमैदानात चिखलच चिखलक्रीडांगण कसे असावे असा कुणी प्रश्न विचारल्यास तर ते भंडारा येथील क्रीडा संकुलासारखे निश्चितच नसावे, असा सल्ला दिला जाईल. सध्या स्थितीत या क्रीडांगणात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. धावपट्टीवर पाणी साचून राहत असल्याने बांधणी व दर्जा कसा असावा असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. धावपट्टीच्या बाजुला असलेल्या नालीवरील लोखंडी आच्छादन तुटलेले असून नालीमध्ये झाडीझुडपी वाढली आहेत. क्रीडांगणातील स्वच्छता करायलाही जिल्हा क्रीडा कार्यालयाला निधी उपलब्ध होत नसावा काय? असा प्राथमिक सवाल क्रीडांगणाची स्थिती बघीतल्यावर उपस्थित होतो.जिल्हा क्रीडा पुरस्काराला दांडीखेळाडूंना शिकविण्यासोबतच त्यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्याची शिकवण प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक देत असतो. अश्या मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकांना दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहीत करण्यात येते. सन २०१६-१७ अंतर्गत देण्यात येणाºया क्रीडा पुरस्काराला यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे दांडी मारण्यात आली. सदर पुरस्कार २६ जानेवारी, १ मे किंवा १५ आॅगस्ट रोजी देण्यात येते. परंतु यावर्षी या पुरस्काराचे वाटप झाले नाही.खेळाडूंचा विकास जेवढा त्यांच्या आत्मशक्तीवर अवलंबून आहे. तेवढीच आवश्यकता मुलभूत क्रीडा सुविधांचीही आहे. निधीचा तुटवडा कायम असल्याने व राजकीय अनास्था असल्याने खेळाडूंचा विकास होत नाही. हीच या जिल्ह्यातील खेळाडूंची शोकांतिका आहे. याकडे क्रीडा विभागासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.- प्रविण कळंबे,फुटबॉल प्रशिक्षक, भंडारा